AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना नसता, तर आतापर्यंत आलियाशी लग्न झालं असतं : रणबीर कपूर

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नेहमीच आपल्या नात्यामुळे चर्चेत असतात. कधीही याअगोदर दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बोलले नव्हते.

कोरोना नसता, तर आतापर्यंत आलियाशी लग्न झालं असतं : रणबीर कपूर
| Updated on: Dec 24, 2020 | 12:36 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) नेहमीच आपल्या नात्यामुळे चर्चेत असतात. कधीही याअगोदर दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बोलले नव्हते. आलिया नेहमीच रणबीर चांगला मित्र असल्याचे सांगते.  मात्र, आता रणबीरने या नात्याबद्दल दुजोरा दिला आहे.  रणबीरने नुकतीच राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत आपली गर्लफ्रेंड आलियाबद्दल सांगितले आणि ऐवढेच नाहीतर लग्न कधी करणार आहे याबद्दल देखील रणबीरने सांगितले आहे. (Alia Bhatt and I would have been married Ranbir Kapoor)

रणबीरने मुलाखतीत सांगितले की, दोघांनी लॉकडाऊनमध्ये एकत्र वेळ घालवला. दिवसभर रणबीर चित्रपट आणि मालिका बघायचा, तर आलिया काहीतरी नवीन शिकत होती. रणबीरने लॉकडाऊनमध्ये आपला वेळ कसा घालवला हे सांगितले. तो म्हणाला की, सुरुवातीला आम्ही कौटुंबिक त्रासातून जात होतो. त्यानंतर, मी पुस्तके वाचण्यास आणि कुटुंबासमवेत वेळ घालवू लागलो आणि दिवसातून 2-3 चित्रपट बघायचो. आलियासोबतच्या लग्नाबाबत रणबीर म्हणतो की, हा कोरोना व्हायरल आला नसता तर कदाचित आम्ही आतापर्यंत लग्न देखील केले असते.

रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले होते. नुकत्याच एका मुलाखतीत ‘स्टार’ आणि ‘डिज्नी इंडिया’ चे अध्यक्ष उदय शंकर यांनी ‘ब्रह्मास्त्र’ हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट असण्याची शक्यता वर्तविली आहे. ‘एचटी लीडरशिप समिट 2020’मध्ये बोलताना शंकर म्हणाले की, “ब्रह्मास्त्र” हा आतापर्यंत बनलेला भारतातील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. पण याबद्दल बोलताना उदय यांनी चित्रपटाचे बजेट जाहीर केले नाही.

जेव्हा उदय शंकर यांना, ‘ब्रह्मास्त्र चित्रपटाची एकूण किंमत 300 कोटी आहे का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, त्यापेक्षाही जास्त आहे. असा कोणताही चित्रपट करण्यास वेळ लागतो. आणि अशा चित्रपटाला चित्रपटगृहात चांगला प्रेक्षक वर्ग मिळू शकतो. या चित्रपटामध्ये खूपसे ग्राफिक्स वापरले आहे. करण जोहर हा चित्रपट ओटीटी रिलीजवर करण्याबाबत उत्सुक नसल्याचे म्हटले जात होते.

संबंधित बातम्या : 

Nachunga Aise | अभिनेता कार्तिक आर्यनच्या गाण्याचे टीझर रिलीज, तुम्ही पाहिलात का? कार्तिकचा नवा लूक!

Rinku Rajguru | लॉकडाऊनचा ‘आर्ची’ला फटका, रिंकू राजगुरु लंडनमध्ये अडकली

(Alia Bhatt and I would have been married Ranbir Kapoor)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...