Alia Bhatt: आलिया भट्टच्या लेकीचा फोटो व्हायरल; नेमकं काय आहे सत्य?

आलिया भट्टची चिमुकली अशी दिसते; काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य?

Alia Bhatt: आलिया भट्टच्या लेकीचा फोटो व्हायरल; नेमकं काय आहे सत्य?
आलिया भट्टच्या लेकीचा फोटो व्हायरल; नेमकं काय आहे सत्य?
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 09, 2022 | 1:47 PM

मुंबई: अभिनेत्री आलिया भट्टने रविवारी (6 नोव्हेंबर) गोंडल मुलीला जन्म दिला. कपूर कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. चिमुकलीच्या जन्माची बातमी कळताच भट्ट आणि कपूर कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. तर सोशल मीडियावरही रणबीर कपूर आणि आलियावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सर्वसामान्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही आलियाच्या मुलीला भेटण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहेत.

आलियाने बाळात तिच्या मिठीत घेतल्याचा एक आणि प्रेमाने तिचं चुंबन घेतानाचा दुसरा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. मात्र व्हायरल होत असलेले हे फोटो आणि व्हिडीओ खरे नाहीत.

मुलीच्या जन्मानंतर आलियाने सोशल मीडियावर फक्त एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने बाळाच्या जन्माची बातमी चाहत्यांना सांगितली. मात्र कुठलाही फोटो किंवा व्हिडीओ आलियाकडून अथवा तिच्या कुटुंबीयांकडून अद्याप शेअर करण्यात आला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटो आणि व्हिडीओमध्ये सत्यता नाही.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. 2018 मध्ये या दोघांनी पहिल्यांदा जेव्हा एकत्र सोनम कपूरच्या लग्नाला हजेरी लावली, तेव्हा त्यांच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली. जवळपास सहा-सात वर्षे डेट केल्यानंतर रणबीर-आलियाने या वर्षी एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधली.