AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Allu Arjun: अल्लू अर्जुनची मोठी झेप; ‘फोर्ब्स इंडिया’च्या कव्हरवर झळकला ‘पुष्पा’ स्टार

Allu Arjun: 'पुष्पा: द राइज' आणि 'पुष्पा: द रुल' या चित्रपटांमुळे फक्त दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रियचा मिळवणाऱ्या अल्लू अर्जुनने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. 'फोर्ब्स इंडिया'च्या कव्हरवर झळकण्याचा मान त्याला मिळाला आहे.

Allu Arjun: अल्लू अर्जुनची मोठी झेप; 'फोर्ब्स इंडिया'च्या कव्हरवर झळकला 'पुष्पा' स्टार
Allu ArjunImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 28, 2026 | 12:39 PM
Share

Allu Arjun: साऊथ सुपरस्टार आणि ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुन याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अल्लू अर्जुनला आता ‘फोर्ब्स इंडिया’च्या ‘शोस्टॉपर्स 2026’ या विशेष आवृत्तीच्या कव्हरवर स्थान मिळालं आहे. भारतातील 100 प्रभावशाली सेलिब्रिटींचा गौरव करणाऱ्या या यादीत त्याचं नाव समाविष्ट असून, कव्हर स्टार म्हणून त्याची निवड होणं ही त्याच्या वाढत्या पॅन-इंडिया स्टारडमची मोठी पावती मानली जात आहे. अल्लू अर्जुनचा प्रवास केवळ तेलुगू चित्रपटांपुरता मर्यादित राहिलेला नाही. ‘पुष्पा: द राइज’ आणि ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटांच्या जबरदस्त यशानंतर त्याची लोकप्रियता देशभरात पोहोचली. त्याची स्टाइल, डान्स, संवादफेक आणि पडद्यावरील वेगळ्या अंदाजाने हिंदी पट्ट्यातही मोठा चाहतावर्ग निर्माण केला.

‘पुष्पा’ फ्रँचाइझीने अल्लू अर्जुनला पॅन-इंडिया स्टार म्हणून नवी ओळख मिळवून दिली. त्याचा परिणाम केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर ब्रँड व्हॅल्यू आणि जाहिरातींच्या बाजारपेठेतही दिसून आला. ‘फोर्ब्स इंडिया’च्या या सन्मानातून त्याच्या वाढत्या प्रभावाची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली आहे. ‘फोर्ब्स इंडिया’च्या ‘शोस्टॉपर्स 2026’ आवृत्तीत मनोरंजन, क्रीडा, संगीत आणि लोकप्रिय संस्कृतीतील देशातील आघाडीच्या सेलिब्रिटींचा गौरव करण्यात आला आहे. या यादीत अल्लू अर्जुनसोबत शाहरुख खान, विराट कोहली आणि स्मृती मंधाना यांसारख्या मोठ्या नावांचाही समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by Forbes India (@forbesindia)

विशेष म्हणजे, तेलुगू चित्रपटसृष्टीतून अल्लू अर्जुन आणि राम चरण या दोघांनाच या यादीत स्थान मिळालं आहे. त्यामुळे या दोन्ही कलाकारांच्या माध्यमातून तेलुगू सिनेमाचा वाढता राष्ट्रीय प्रभावही अधोरेखित झाला आहे. अल्लू अर्जुनची लोकप्रियता आता केवळ त्याच्या चित्रपटांच्या कमाईवर मोजली जात नाही. त्याचा फॅशन सेन्स, सोशल मीडिया प्रभाव आणि ब्रँड्ससोबतचं नातं यामुळे तो देशातील प्रभावशाली सेलिब्रिटींपैकी एक बनला आहे.

अल्लू अर्जुनकडे सध्या मोठे प्रोजेक्ट्स आहेत. तो अटली दिग्दर्शित ‘राका’ या आगामी चित्रपटावर काम करत आहे. याशिवाय लोकेश कनगराजसोबतच्या AA23 या प्रोजेक्टचीही चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात त्याचा पॅन-इंडिया प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,