AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे’, आमीरच्या लेकीने बॉयफ्रेंडसाठी शेअर केला रोमँटिक व्हिडीओ

आयराचे आणि बॉयफ्रेंड नुपूरचे कॅमेरात कैद केलेले काही खास क्षण या व्हिडीओत एकत्रित करण्यात आले आहेत. या व्हिडीओत नुपूर आणि आयराचे अतिशय सुंदर आणि रोमँटिक फोटो पाहायला मिळत आहेत.

Video | ‘माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे’, आमीरच्या लेकीने बॉयफ्रेंडसाठी शेअर केला रोमँटिक व्हिडीओ
आयरा खान
| Updated on: Jun 01, 2021 | 1:14 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची (Amir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) नेहमीच चर्चेत असते. आपली बेधडक वक्तव्य आणि बिनधास्त अंदाज यामुळे आयारा चर्चेत असते. मात्र, सध्या ती चर्चेत आहे ती बॉयफ्रेंड नुपूर शिखरे (Nupur Shikhare) याच्या सोबतच्या नात्यामुळे! आयरा बोयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच आयराने तिच्या सोशल मीडियावर एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे (Amir Khan daughter Ira Khan share romantic video for boyfriend Nupur Shikhare).

नुपूर आमीरचा फिटनेस कोच देखील आहे. आमीरच्या लेकीसोबतच्या नात्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. आयारा देखील त्याच्यासोबतचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतात तिने बॉयफ्रेंड नुपूरसाठी एक खास रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्यांचे काही खास क्षण दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आयराचे आणि बॉयफ्रेंड नुपूरचे कॅमेरात कैद केलेले काही खास क्षण या व्हिडीओत एकत्रित करण्यात आले आहेत. या व्हिडीओत नुपूर आणि आयराचे अतिशय सुंदर आणि रोमँटिक फोटो पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, ‘माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे’, असं म्हटलं आहे. या व्हिडीओतून आयरा आणि नुपूरमधील स्ट्राँग बाँड दिसून येत आहे. त्यांच्या या रोमँटिक व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक सेलेब्सनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत (Amir Khan daughter Ira Khan share romantic video for boyfriend Nupur Shikhare).

रिलेशनशिपची कबुली!

आयराने सोशल मीडियावर नुपूरशी असलेल्या तिच्या नात्याची पुष्टी केली होती. तिने नुपूरबरोबरचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, मी तुमच्याबरोबर आहे असे, मी अभिमानाने सांगू शकते. तथापि, नुकतेच आयरा ज्या प्रकारे नुपूरबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते, त्यावरून असे दिसते की आता ती आपले वैयक्तिक जीवन प्रत्येकासह शेअर करण्यास उत्सुक आहे.

काही दिवसांपूर्वी इराच्या चुलत भावाचे लग्न होते. त्यावेळी इराने लग्नाच्या फंक्शनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात नुपूर शिखरे देखील तिच्यासोबत दिसत होता. नुपूर आणि इरा यांची नावे बर्‍याच काळापासून चर्चेत राहिली होती. काही दिवसांपूर्वी नुपूर आणि इरा आमिरच्या फार्म हाऊसवर सुट्ट्यांचा आनंद लुटत होते. या ट्रीपचे फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

आईशी करून दिली ओळख

आयराने आपली आई रीना दत्ता हिच्याशी नुपूरची ओळख करुन दिली आहे. रीनाला नुपूर खूप आवडला आहे. तिला त्यांच्या नात्यापासून कोणतीही अडचण नाही. काही दिवसांपूर्वी आयरा नुपूरला तिच्या चुलतभावाच्या लग्नालाही घेऊन गेली होती. ती आपल्या संपूर्ण कुटुंबाला नुपूरजवळ आणत आहे.

(Amir Khan daughter Ira Khan share romantic video for boyfriend Nupur Shikhare)

हेही वाचा :

सुशांतच्या जवळच्या मित्रांचा NCB कडून शोध, तर नोकर केशव-नीरज साक्षीदार होणार

Video | ‘म्हणतात हॅलो करतात फॉलो इन्स्टा, ट्विटरला…’, माधुरी पवारचा घायाळ करणारा डान्सिंग अंदाज, पाहा व्हिडीओ

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.