AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘म्हणतात हॅलो करतात फॉलो इन्स्टा, ट्विटरला…’, माधुरी पवारचा घायाळ करणारा डान्सिंग अंदाज, पाहा व्हिडीओ

केवळ अभिनय आणि नृत्यच नव्हे तर, सोशल मीडियावर देखील माधुरीच्या नावाची मोठी चर्चा असते. तिचे अनेक डान्स व्हिडीओज सोशल मीडियावर चर्चेत असतात. तिच्या डान्स व्हिडीओमुळे ती युवा पिढीचे नेहमीच आकर्षण ठरत असते.

Video | ‘म्हणतात हॅलो करतात फॉलो इन्स्टा, ट्विटरला...’, माधुरी पवारचा घायाळ करणारा डान्सिंग अंदाज, पाहा व्हिडीओ
माधुरी पवार
| Updated on: Jun 01, 2021 | 12:18 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ऑफ एअर गेल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात त्यातील पात्र नेहमीच जिवंत राहतात. अशीच एक मालिका अर्थात ‘तुझ्यात जीव रंगला’! या मालिकेतील ‘राणादा’, ‘अंजली बाई’, ‘गोदाक्का’, ‘वहिनीसाहेब’ अशी सगळीच पात्र कमालीची गाजली होती. विशेषतः या मालिकेतील खलनायिक अर्थात ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका प्रचंड गाजली होती. अभिनेत्री धनश्री काडगावकरने ही भूमिका उत्तमरीत्या निभावली होती. मात्र, तिच्या एक्झिटनंतर आलेल्या नव्या वहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) हिने देखील या पात्राचं शिवधनुष्य लिलया पेललं होतं(Tujhyat Jeev Rangla Fame Actress Madhuri Pawar Dance video goes viral on social media).

केवळ अभिनय आणि नृत्यच नव्हे तर, सोशल मीडियावर देखील माधुरीच्या नावाची मोठी चर्चा असते. तिचे अनेक डान्स व्हिडीओज सोशल मीडियावर चर्चेत असतात. तिच्या डान्स व्हिडीओमुळे ती युवा पिढीचे नेहमीच आकर्षण ठरत असते. नुकताच तिने एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘छबीदार छबी..’ या गाण्यावर माधुरीने धमाल डान्स केला आहे.

पाहा व्हिडीओ :

ऑफ शोल्डर ब्लाऊज आणि जांभळ्या रंगाची नऊवारी साडी सोबत डान्सच्या हटके अदा, चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. मालिकेत नेहमीच ‘खाष्ट’ भूमिकेत दिसणाऱ्या माधुरीच्या या घायाळ करणाऱ्या अदा पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. याच कारणाने माधुरी सध्या अनेक इव्हेंटसाठी आणि इतर कार्यक्रमांसाठी अनेकांची पसंती ठरत आहे. माधुरीने या अगोदरही छोट्यापडद्यावर काम केलं आहे. ‘झी युवा’ वरील ‘अप्सरा आली’ या डान्स शो आपल्या नृत्याचे  जलवे दाखत ती विजेती ठरली होती (Tujhyat Jeev Rangla Fame Actress Madhuri Pawar Dance video goes viral on social media).

‘तुझ्यात जीव रंगला’ने दिली खरी ओळख!

मालिका विश्वात राणा आणि अंजलीची जोडी चांगलीच चर्चेत होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत इतर पात्रांप्रमाणे ‘नंदिता वहिनीं’ची (Nandita Vahini) खलनायकी भूमिकाही तितकीच लक्षवेधी ठरली होती. मालिकेतील ‘वहिनी साहेबां’चे पात्र संवाद आणि तिच्या हटके स्टाईलमुळे लोकप्रिय झाले होते. मध्यंतरीच्या काळात कथानकाप्रमाणे या वहिनी साहेबांची तुरुंगात रवानगी झाली होती. ‘नंदिता’ साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगांवकरने मालिकेला ‘रामराम’ म्हटल्याने कथेत ट्विस्ट आला होता. फसवेगिरी आणि कटकारस्थानासाठी शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेबांनी मालिकेत पुन्हा एंट्री घेतल्यावर आता नव्या वहिनीसाहेब कोण असणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होतीच.

एकीकडे या मालिका शेवटच्या टप्प्यात होती. तर प्रेक्षक देखील वहिनीसाहेबांना मिस करत होते. प्रेक्षकांची हीच उत्सुकता लक्षात घेता माधुरीच्या रुपात ‘नंदिता वहिनी’ची मालिकेत पुन्हा एकदा दमदार एंट्री झाली होती. धनश्री काडगावकरने मालिकेला गुडबाय म्हटल्याने ही भूमिका माधुरीकडे आली. या पात्राचं वेगळेपण जपत माधुरी देखील प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरांत पोहोचली.

(Tujhyat Jeev Rangla Fame Actress Madhuri Pawar Dance video goes viral on social media)

हेही वाचा :

Photo : घाडगेंच्या सूनेचा ग्लॅमरस अंदाज, भाग्यश्री लिमयेचं नवं फोटोशूट

PHOTO | ‘मराठी रंगभूमीने प्रेक्षकांचं प्रेम तर दिलच पण अनेक आनंदाचे क्षणही दिले’, प्रशांत दामलेंनी शेअर केले खास फोटो!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.