AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांना सतावतेय ही चिंता, चालण्यापासून के कागद उचलेपर्यंत घ्यावा लागतोय आधार; नेमकं काय झालं बिग बींना?

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर चाहत्यांशी सवांद साधताना एक भावनिक पोस्ट केली आहे.की वयोमानाचा त्यांच्यावर  परिणाम होऊ लागला आहे. पहिल्यासारख्या गोष्टी सोप्या राहिलेल्या नाही . प्रत्येक गोष्टीसाठी आता आधार लागतो. असं म्हणत त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.   

अमिताभ बच्चन यांना सतावतेय ही चिंता, चालण्यापासून के कागद उचलेपर्यंत घ्यावा लागतोय आधार; नेमकं काय झालं बिग बींना?
Amitabh Bachchan Emotional Post, Ageing ChallengesImage Credit source: tv9 marathi
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Aug 19, 2025 | 1:29 PM
Share

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन वयाच्या 83 व्या टप्प्याकडे वाटचाल करत आहेत, पण आजही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. ते अजूनही चित्रपट आणि टीव्हीमध्ये त्याच जोशाने पुढे जात आहेत. या वयातही चित्रपट, जाहिराती, करत आहेत. त्यांच्यात कितीही उत्साह असला तरी देखील वय मात्र वाढायचं थांबत नसतं त्याचे परिणाम हे दिसून येतातच. वयाचा परिणाम आता त्यांच्या दैनंदिन जीवनावर दिसून येत आहे. एवढंच नाही तर आता बिग बी यांनी लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपतीच्या 17 व्या सीझनची सुरुवात धमाकेदारपणे केली आहे. पण वयानुसार त्यांच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम दिसून येत आहे. त्यांनी स्वत: याबद्दल एक भाविनक पोस्टही शेअर केली आहे.

ब्लॉगवर मनातील भावना व्यक्त केल्या

सोशल मीडियावर सक्रिय असलेले अमिताभ बच्चन दररोज त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधतात. त्यांच्या ब्लॉगवर त्यांच्या मनातील भावना व्यक्त न करणारा असा एकही दिवस जात नाही. रविवारी त्यांनी एक भावनिक ब्लॉग शेअर केला ज्यामध्ये त्यांनी सांगितले की साधी कामे देखील त्यांच्यासाठी आव्हान बनली आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दर रविवारी त्यांच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांच्या गोष्टींचाही उल्लेख असतो. त्यांनी लिहिले की, ‘जोपर्यंत मी बाहेर जाऊन त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत मला विश्वासच बसत नाही की इतके लोक फक्त मला भेटण्यासाठी आले आहेत. त्यांच्या जयजयकारामुळे मला ऊर्जा मिळते आणि माझी चिंता दूर होते.’

एका दिवसाच्या विश्रांतीचा देखील दीर्घकालीन परिणाम होतो

बिग बी यांनी असेही म्हटले की, त्यांचीदैनंदिन दिनचर्या औषधे आणि आवश्यक व्यायामांवर अवलंबून असते. त्यांची चालण्याची क्षमता अबाधित राहावी म्हणून ते दररोज जिममध्ये गतिशीलता व्यायाम करतात. त्यांनी लिहिले, ‘पूर्वी असे वाटत होते की जुन्या सवयी पुन्हा सहजपणे सुरू करता येतील, परंतु आता मला समजले आहे की एका दिवसाच्या विश्रांतीचा देखील दीर्घकालीन परिणाम होतो.”

डॉक्टर म्हणाले तोल गमावून पडू शकता

अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की त्यांना आता पँट घालण्यासारखी साधी कामेही करायला त्यांना त्रास होतो. त्यांना चालण्यासाठी जिममध्ये मोबिलिटी व्यायाम करावे लागतात.त्यांनी लिहिले, ‘ज्या गोष्टी पूर्वी सोप्या होत्या, त्या आता जमत नाहीयेत. डॉक्टरांनी सांगितलं की कृपया बच्चन साहेब, बसून पँट घाला. उभे राहून ते करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर तुम्ही तुमचा तोल गमावून पडू शकता.’ त्यांनी विनोदाने पुढे म्हटले की सुरुवातीला ते या सल्ल्यावर हसायचे, पण आता त्यांना वाटते की डॉक्टर बरोबर होते.”

घरात सर्वत्र हँडलबार लावण्यात आले आहेत 

त्यांनी असेही म्हटले आहे की त्यांच्या ‘जलसा’ या घरात सर्वत्र हँडलबार (सपोर्ट रेलिंग) बसवण्यात आले आहेत जेणेकरून त्यांना चालताना आधार मिळेल. बिग बी यांनी लिहिले की, ‘आता टेबलावरून पडलेला कागद उचलण्यासारखे सोपे काम देखील खूप कठीण वाटते. पूर्वी ते सोपे वाटत होते, पण आता मला समजले की ते एक मोठे काम आहे.”

म्हातारपण अचानक ब्रेक लावतं

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या या टप्प्याचे वर्णन जीवनाचे सत्य म्हणून केले. त्यांनी लिहिले, ‘वय जन्मापासूनच सुरू होते. तारुण्याला आव्हानांचा सामना लवकर करावा लागतो, परंतु म्हातारपण अचानक ब्रेक लावते आणि आता काळजीपूर्वक चालायला सांगते.’ त्याच्या पोस्टच्या शेवटी, त्यांनी त्याच्या चाहत्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये अशी प्रार्थना केली, परंतु हे वास्तव प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक दिवस येते हे देखील मान्य केले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...