‘जया आणि मी ठरवलंय…’ अभिषेक की श्वेता? अमिताभ बच्चन यांची प्रॉपर्टी कोणाला मिळणार? बिग बींनी स्वत:च केला खुलासा

बच्चन कुटुंबाची एकूण संपत्ती 1600 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांची प्रॉपर्टी ही नक्की कोणाच्या नावे करणार आहेत ते. अभिषेक की मुलगी श्वेताच्या नावे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी याचा निर्णय आधीच घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

जया आणि मी ठरवलंय... अभिषेक की श्वेता? अमिताभ बच्चन यांची प्रॉपर्टी कोणाला मिळणार? बिग बींनी स्वत:च केला खुलासा
Amitabh Bachchan Property
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 09, 2025 | 8:40 PM

बॉलिवूडमधील प्रभावशाली जोडपे म्हणून अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन देखील कायम चर्चेत असतात. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी आपल्या मुलगा आणि मुलीच्या संगोपनात कोणताही भेदभाव केला नाही. बिग बी यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की त्यांच्या मालमत्तेचा हक्कदार कोण असेल याबाबत सांगितलं होतं.

“मी जेव्हा मरेन…”

अमिताभ बच्चन यांनी एका जुन्या मुलाखतीत म्हटले होते, “मी जेव्हा मरेन, तेव्हा माझ्याकडील थोडीफार जी संपत्ती आहे ती माझ्या मुलगा आणि मुलीमध्ये समान वाटणार आहे. यात कोणताही फरक असणार नाही. जया आणि मी हा निर्णय आधीच खूप वर्षांपूर्वीच घेतला आहे.”

नक्की कोणाच्या नावे करणार संपत्ती?

पुढे ते म्हणाले, “प्रत्येकजण म्हणतो की मुलगी ही परक्याचं धन असते, ती तिच्या पतीच्या घरी जाते. पण माझ्या दृष्टीने ती माझी मुलगी आहे, तिला अभिषेकइतकाच अधिकार आहे.” हुरून इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार, अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाकडे 1600 कोटी रुपयांची संपत्ती आहे. एका जुन्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की बिग बी यांनी त्यांचा जुना बंगला ‘प्रतीक्षा’ मुलगी श्वेता हिला भेट म्हणून दिला आहे. अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याची किंमत आज 50 कोटी रुपये आहे. मुंबईत त्यांच्या आणखी काही मालमत्ता आहेत. बच्चन कुटुंबाच्या काही मालमत्ता अयोध्या आणि पुणे येथेही आहेत.


‘प्रतीक्षा’ बंगल्यात एक खोली आहे….

केबीसीच्या विशेष भागात जोया बच्चन यांनी सांगितले होते की अमिताभ बच्चन यांना संगीताची किती आवड आहे. त्यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यात एक खोली आहे, ज्याला ते म्युझिक रूम म्हणतात. तिथे त्यांनी सर्व वाद्ये ठेवली आहेत. त्यावेळी बिग बी म्हणाले होते की ते म्युझिक रूम आता अगस्त्यचे आहे. अमिताभ बच्चन आता 82 वर्षांचे आहेत. तरीही ते चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. अलीकडेच ते ‘कल्कि 2898 AD’या चित्रपटात दिसले होते, या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले.