AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकपच्या तिसऱ्या दिवशी 2 जबरदस्त झेल, झिम्बाब्वे आणि कॅनाडाच्या खेळाडूंची कमाल Video

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी तीन सामने पार पडले. स्कॉटलँड विरुद्ध इटली, झिम्बाब्वे विरुद्ध ओमान आणि दक्षिण अफ्रिका विरूद्ध कॅनडा सामना पार पडला. यापैकी दोन सामन्यात दोन झेल चर्चेत राहिले. चला जाणून घेऊयात.

टी20 वर्ल्डकपच्या तिसऱ्या दिवशी 2 जबरदस्त झेल, झिम्बाब्वे आणि कॅनाडाच्या खेळाडूंची कमाल Video
टी20 वर्ल्डकपच्या तिसऱ्या दिवशी 2 जबरदस्त झेल, झिम्बाब्वे आणि कॅनाडाच्या खेळाडूची कमाल VideoImage Credit source: ICC Twitter
| Updated on: Feb 09, 2026 | 8:43 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून रोज काही नाही घडत आहे. मग नवे विक्रम असो की जुने विक्रम मोडण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी हॅटट्रीक, जबरदस्त झेल आणि धाकधूक वाढवणारे सामने पाहता आले. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. या दोन वेगवेगळ्या सामन्यात घेतलेल्या झेलची चर्चा रंगली आहे. पहिला झेल हा झिम्बाब्वे विरुद्ध ओमान सामन्यात पकडला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेच्या ब्रायने बेनेटने जबरदस्त झेल पकडला. ब्रायन 19 मीटर धावत मोठी उडी घेतली आणि झेल घेतला. हा झेल घेताना दूरपर्यंत मैदानावर घासत गेला, पण झेल सोडला नाही. या झेलची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दुसरा झेल दक्षिण अफ्रिका आणि कॅनडा सामन्यात पकडला गेला. रायन रिकल्टनचा अप्रतिम झेल हर्ष ठाकरने सीमेरेषेवर पकडला. हा नुसता झेल नव्हता तर षटकारही वाचवला. चला या दोन्ही झेलबाबत जाणून घेऊयात

टी20 वर्ल्डकपच्या तिसऱ्या दिवशी झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटने 20व्या षटकाच्या पाचव्या चेंडवर हा झेल पकडला. नदीम खानने ब्रॅड इवान्सच्या गोलंदाजीवर मिड विकेटला फटका मारला. यावेळी डीप स्क्वेअर लेगला असलेल्या बेनेट वेगाने डाव्या बाजूला धावत सुटला. यावेळी त्याने 19 मीटरची धाव घेतल्यानंतर उडी मारली आणि झेल पकडला.

कॅनडाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दक्षिण अफ्रिकेचा धावगतीला ब्रेक लावण्याचा कॅनडाने पुरेपूर प्रयत्न केला. या सामन्यात तिसरी विकेट ही रायन रिकल्टनची विकेट पडली. ही विकेट सहज मिळाली नाही. रिकल्टनने 21 चेंडूत 33 धावा केल्या. या तीन चौकार आणि 1 षटकार मारला. अंश पटेलच्या चेंडूवर त्याने उत्तुंग फटका मारला होता. षटकार जाईल असं वाटलं होतं. पण हर्ष ठकरने जबरदस्त झेल पकडला.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजच्या हेटमायरने अप्रतिम झेल पकडला होता. तर मॅकमुलेनने हेटमायरचा जबरदस्त झेल पकडला. या दोन्ही झेलची पहिल्या दिवशी चर्चा झाली होती. आता यात आणखी दोन झेलची भर पडली आहे.

Follow Us
एक बिहारी, सब पे भारी! शिंदे गटातील नेत्याच्या विधानाची राज्यभर चर्चा
एक बिहारी, सब पे भारी!' शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्
News Headline : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्स...
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा