AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonia Gandhi: सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची तुफान चर्चा, एका आठवड्यात 2 लाख प्रतींची विक्री, 5 विक्रमांची नोंद

Sonia Gandhi Book : सोनिया गांधी यांच्या बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव या पुस्तकाला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. एका आठवड्यात जवळपास 2 लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. हॉर्पर कॉलिन्सने विक्रीशी संबंधित आकडेवारी समोर आणली आहे.

Sonia Gandhi: सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची तुफान चर्चा, एका आठवड्यात 2 लाख प्रतींची विक्री, 5 विक्रमांची नोंद
सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची तुफान चर्चा, एका आठवड्यात 2 लाख प्रतींची विक्री, 5 विक्रमांची नोंद
| Updated on: Nov 17, 2026 | 7:56 AM
Share

Sonia Gandhi Book : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे पुस्तक बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लवने विक्रीचं तुफान आणलं आहे. या पुस्तकाने एकाचवेळी पाच विक्रम नावावर नोंदवले आहे. या पुस्तकाचे प्रकाशक हार्पर कॉलिन्स इंडियाने सोमवारी पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी ही माहिती दिली. 10 नोव्हेंबर रोजी पुस्तक बाजारात आले तेव्हापासून एका आठवड्यात या पुस्तकाच्या 2 लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. हार्पर कॉलिन्स इंडियाचे CEO अनंत पद्मनाभन यांनी बुक लॉन्चिंगदरम्यान याविषयीची माहिती दिली. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे. हे सर्वाधिक वेगाने विक्री होणारे पुस्तक ठरले आहे. तसेच वेगाने विक्री होणारे आत्मचरित्र आणि नॉन-फिक्शन पुस्तक असल्याची माहिती त्यांनी दिली.

पुस्तकाच्या प्रतिसादाबद्दल सोनिया गांधी आनंदी

पुस्तकाला मिळत असलेल्या तुफान प्रतिसादाबद्दल सोनिया गांधी आनंदी आहेत. वाचकांच्या प्रतिक्रिया त्यांच्यासाठी चांगल्या आहेत. पुस्तक खरेदी करणारे वाचक, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या या पुस्तकावर प्रतिक्रिया देणारे वाचक आणि टीकाकारांही जोडल्या गेले आहेत, त्यावर त्या अत्यंत आनंदी आहेत. टीका सुद्धा महत्त्वाची असते. ऑनलाईन मिळणाऱ्या प्रतिक्रियांचा उल्लेख करत सोनिया गांधी यांनी सांगितले की काही प्रतिक्रिया अत्यंत वाईट होत्या. तर काही वास्तवाला धरून आणि गंभीर होत्या.

सोनिया गांधी यांनी आत्मचरित्र का लिहिलं, याविषयीची माहिती दिली. गांधी कुटुंबियांबद्दल, पती आणि मुलांबाबत समाजात अनेक चुकीच्या गोष्टी आणि अफवा पसरवल्या जातात. या सर्वांना उत्तर देण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाची खरी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी हे पुस्तक लिहिल्याची माहिती त्यांनी दिली.

राहुल आणि प्रियंका यांच्या आग्रहामुळे लिहिले पुस्तक

आपले मित्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर पुस्तक लिहण्याचा आग्रह धरत होते. सुरुवातीला आपल्या आयुष्यातील कोलाहल आणि अनुभव मांडण्यास सोनिया गांधी यांना संकोच वाटत होता. पण नंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी त्यांना आग्रह केला. पुढे त्यांनी पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला हे कठीण होते. पण जेव्हा मी लिहिण्यास सुरूवात केली, तेव्हा मात्र लिहिते झाले, असा अनुभव सोनिया गांधी यांनी सांगितला.

Follow Us
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्
News Headline : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्स...
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड