Amitabh Bachchan : time to retire म्हणताच चर्चांना उधाण; अमिताभ बच्चन यांचं रोखठोक उत्तर

Amitabh Bachchan On Retirement : शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याबद्दल येणाऱ्या एका बातमीने चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली. नुकतंच त्यांनी एक विधान केल्यानंतर ते कामापासून दूर होत असल्याच्या चर्चांनी जोर धरला. पाहता पाहता ‘रिटायरमेंट’ चं वृत्त समोर आलं. मात्र आता या सर्वावर मौन सोडत बिग बींनी त्यांची भूमिका सप्षट् केली आहे. ज्या अंदाजात त्यांचीन या सर्वांवर उत्तर दिलंय, ते पाहून तुमच्याही भुवया उंचावतील हे नक्की..

Amitabh Bachchan : time to retire म्हणताच चर्चांना उधाण; अमिताभ बच्चन यांचं रोखठोक उत्तर
| Updated on: Sep 15, 2026 | 2:49 PM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे चित्रपट आणि जाहिरातीती, क्विझ शो यांच्या शूटिंगमध्ये सदैव व्यस्त असतात. वयाच्या 80 व्या वर्षानंतरही अविरत काम करणारे बिग बी चांगलेच बिझी असतात, मात्र त्यांच्या व्यस्त शेड्य़ुलमधून वेळ काढूनही ते सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टिव्ह असतात तसेच त्यांचा ब्लॉगही नियमितपणे लिहितात. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती 18’ हा शो होस्ट करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या शोशी निगडीत काही अनुभव शेअर केले होते . त्यातील स्पर्धकांचे अनुभव ऐकून शो होस्ट करत राहणं कठीण होतं असं बिग बी यांनी म्हटलं होतं.त्याचदरम्यान त्यांनी काही अनुभवही सांगितले आणि ‘आय विश टू रिटायर नाऊ.’ असंही ब्लॉगच्या शेवटी लिहीलं होतं. मात्र त्यानंतर बिग बींच्या रिटायरमेंट्च्या चर्चा जोर धरू लागल्या आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र या सर्वांवर आता बिग बींनीच मौन सोडलं असून थेट शब्दांत स्पष्टीकरण दिलं आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या नव्या ब्लॉगमध्ये एका वृत्तपत्रातलं कटिंग शेअर केलं, ज्यात त्यांच्या रिटायरमेंटबद्दल लिहीण्यात आलं होतं. मात्र आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असं, बिग बींनी या वेळी स्पष्ट केलं.

अमिताभ यांनी दिलं चोख प्रत्युत्तर

मी माझ्या ब्लॉगमध्ये ‘ इट्स लेट, टाइम टू रिटायर ‘ अलस लिहीलं होतं, असं बिग बींनी नमूद केलं. मात्र याचा संदर्भ कामाशी नव्हे, तर रात्री उशीर झाल्यामुळे (आता) लिखाण थांबवून झोपायला जायाला पाहिजे, असं माझ्या म्हणण्याचा अर्थ होता. ‘जी नहीं हुजूर, मैं काम से रिटायर नहीं हो रहा हूं.’ असं बिग यांनी पुढे मजेशीर अंदाजात लिहीलं. मी झोपायला जात होतो, असं म्हणत होतं, असं बिगी बींनी स्पष्ट केलं.

आपलं स्पष्टीकरण देतानाच अमिताभ यांनी मीडियावरही निशाणा साधला. मेजशीर अंदाजात त्यांनी मीडियाला टोमणा मारला. मात्र अभिनयातून संन्यास घेण्याचा किंवा रिटायरमेंटचा काहीही विचार नसल्याचं, तशी कोणतीही घोषणा केलेली नसल्याचंही स्प्षटीकरण अमिताभ यांनी दिलं.

खरं तर, काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी KBC शी संबंधित आपल्या ब्लॉगमध्ये शोदरम्यान येणाऱ्या स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित कहाण्यांचा उल्लेख केला होता. त्यांनी लिहिले होते की, अनेक स्पर्धक इतक्या गंभीर आणि भावनिक वैयक्तिक परिस्थिती घेऊन शोमध्ये येतात की, त्यांच्या भावना सांभाळणेच नव्हे तर शोचे सूत्रसंचालन करणेही त्यांच्यासाठी कठीण होऊन जाते. बिग बी यांनी याला ‘हृदय पिळवटून टाकणारा अनुभव’ असे म्हटले होते आणि याच भावनिक संदर्भात त्यांनी आता निवृत्त व्हायचे असल्याचे लिहिले होते.

2000 पासून KBC होस्ट करतात बिग बी

2000 साली सुरू झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या कार्यक्रमाशी अमिताभ बच्चन हे सातत्याने जोडलेले आहेत. मात्र, तिसऱ्या सीझनमध्ये त्यांनी शोचं सूत्रसंचालन केलं नव्हतं.त्यावेळी सीझनची जबाबदारी अभिनेता शाहरुख खानने सांभाळली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पुन्हा शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारली आणि आजही ते KBC च्या सर्वात मोठ्या चेहऱ्यांपैकी एक आहेत. सध्या केबीसीचा 18 वा यशस्वी सीझन सुरूये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us