Amruta Fadnavis : प्रविण दरेकरांच्या गरब्यात अमृता फडणवीस यांच्या गाण्याची धूम, म्हणाल्या…
Amruta Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांनी आयोजित केलेल्या गरब्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी स्वतःच्याच 'मारी महिसागर' (Maari Mahisagar) या गाण्यावर ताल धरल्या, त्या काय म्हणाल्या जाणून घ्या...

देशात सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम आहे. सर्वत्र देवीची मोठ्या भक्तीभावाने पूजा होत आहे. तर अनेक ठिकाणी गरब्याचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. तर भाजप आमदार प्रवीण दरेकरा यांच्याकडून बोरिवलीतील बाळासाहेब ठाकरे मैदानावर गरब्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मोठ्या उत्साहात मैदानावर गरब्याचा कार्यक्रम पार पडत आहे. तर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायक अमृता फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांनी आयोजित केलेल्या गरब्याला हजेरी लावली. यावेळी प्रविण दरेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यासोबत ताल धरला.
यावेळी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणे ‘मारी महिसागर’ (Maari Mahisagar) देखील वाजवण्यात आलं आणि सर्वांच जण मोठ्या उत्साहाने गाण्यावर थिरकले. गाण्यावर लोकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद पाहून अमृता फडणवीस देखील आनंदी झाल्या.
अमृता फडणवीस आनंद व्यक्त करत म्हणाल्या, ‘रायगड प्रतिष्ठाणाने’ इतका सुंदर गरब्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. लोक एकत्र येत आपल्याच परंपरेला पुढे नेत आहेत, याचा आनंद आहे. माझं गाणं याठिकाणी वाजलं आणि गाण्याला लोकांना चांगला प्रतिसाद दिला याचा देखील आनंद आहे.
तर प्रविण दरेकर म्हणाले, ‘वहिणी आल्या आणि कार्यक्रमाचा चेहरा – मेहरा बदलून गेला. वहिणींचं गाणं आज गरब्यासाठी हिट झालं आहे.’, सांगायचं झालं तर, अमृता फडणवीस यांचं ‘मारी महिसागर’ (Maari Mahisagar) हे गाणं गरब्यासाठी खास ठरत आहे. नवरात्रीनिमित्त हे गाणं ऑक्टोबर 2026 मध्ये रिलीज झालं आहे.
अमृता फडणवीस यांचं ‘मारी महिसागर’ गाणं
सांगायचं झालं तर, अमृता फडणवीसांचं हे पहिलं गाणं नाही. याआधी देखील त्यांची अनेत गाणी प्रदर्शित झाली आणि लोकांनी गाण्यांना डोक्यावर घेतलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित ‘नमन तुला’ (Naman Tula) हे गाणे 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झालं असून यामध्ये अभिनेता रितेश देशमुख देखील झळकला आहे. तर महाशिवरात्री निमित्त ‘शंभू रे’ (Shambhu Re) हे गाणं फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित झालं. ते एक भक्तिगीत आहे.
