AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना रनौतला मोठा झटका; न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश

काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी वांद्रे न्यायालयाने पोलिसांना कंगना रानौत हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. | Kangana ranaut

कंगना रनौतला मोठा झटका; न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे आदेश
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 29, 2020 | 5:39 PM
Share

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांची चौकशी करण्याचे आदेश अंधेरी येथील मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिले आहेत. न्यायालयाचा हा निर्णय कंगना रनौत हिच्यासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. कंगनावर वादग्रस्त वक्तव्ये करुन समाजामध्ये तेढ पसरवल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी वांद्रे न्यायालयाने पोलिसांना कंगना रानौत हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता पोलिसांना कंगनाच्या चौकशीची मुभा मिळाल्याने तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Courts orders probe of Kangana Ranaut)

कंगना रनौत हिने मध्यंतरी बॉलीवूड इंडस्ट्रीवर टीका करताना याठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी मुक्ताफळे कंगना रनौत हिने उधळली होती. या पार्श्वभूमीवर मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. पोलीस कंगना रनौत हिच्यावरोधात तक्रार दाखल करुन घेत नसल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते. अभिनेत्री कंगना रनौत वारंवार बॉलिवूडची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती बॉलिवूडच्या विरोधात बोलते. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडला घराणेशाही आणि कंपूबाजीबद्दल बोलत असते, असेही याचिकेत सांगण्यात आले होते. यानंतर वांद्र न्यायालयाने कंगना रनौत हिच्यावरोधात धार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेकडून 82 लाखांचा खर्च मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut Case) विरुद्धच्या खटल्यासाठी महापालिकेने (BMC) आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या एच पश्चिम विभागीय कार्यालयाने कंगना रनौतच्या वांद्रे पाली हिल येथील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. याप्रकरणी कंगना रनौतने उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती (Kangana Ranaut Case).याप्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख रुपयांचा खर्च केल्याची माहिती पालिकेने माहिती अधिकारात दिली आहे.

संबंधित बातम्या:

Kangana Ranaut | कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेकडून 82 लाखांचा खर्च

उद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही : कंगना रनौत

‘यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं?’ दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या टीकेला कंगना रनौतचा प्रत्युत्तर

(Courts orders probe of Kangana Ranaut)

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...