‘यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं?’ दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या टीकेला कंगना रनौतचा प्रत्युत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात कंगनावर जोरदार हल्ला चढवला. त्याला आता अभिनेती कंगना रानौतने ट्विटरच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं? ते महाराष्ट्र स्वत:च्या मालकीचा असल्याचासारखं का वागतात? असा सवाल कंगनाने विचारला आहे.

'यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं?' दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या टीकेला कंगना रनौतचा प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 1:22 PM

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेला अभिनेत्री कंगना रनौतने ट्विटरवरुन जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत, यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं? ते महाराष्ट्र स्वत:च्या मालकीचा असल्याचासारखं का वागतात? असा सवाल कंगनाने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात कंगनावर जोरदार हल्ला चढवला होता. घरी खायला मिळत नाही, मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कंगनाचा समाचार घेतला होता. त्यावर ट्विटरच्या माध्यमातून कंगनानेही जहरी टीका केली आहे. (Actress kangana Ranavat answer to CM Uddhav Thackeray)

“मुख्यमंत्री, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लोकसेवक असून तुम्ही अगदी शुल्लक गोष्टींवरुन संघर्ष करत आहात. तुमच्याजवळ असलेली सत्ता तुमच्या मताशी सहमत नसलेल्यांचा अपमाप करण्यासाठी, त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापरत आहात. घाणेरडं राजकारण करुन मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी”, अशा शब्दात कंगनाने मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

कंगना एवढ्यावरच थांबली नाही, तिने अजून एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. “मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कुणी बनवलं? ते फक्त जनतेचे सेवक आहेत. त्यांच्यापूर्वी कुणी होतं, त्यांच्यानंतरही कुणीतरी त्यांची जागा घेईल. ते महाराष्ट्रात स्वत:च्या मालकीच्या असल्यासारखं का वागतात?” असा प्रश्न कंगनाने विचारला आहे.

मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची या मुख्यमंत्र्यांच्या टीकेलाही कंगनानं प्रत्युत्तर दिलंय. “ज्या प्रकारे हिमालयाचं सौंदर्य प्रत्येक भारतीयांसाठी आहे. त्यानुसारच मुंबईही सगळ्यांची आहे. तिथे मिळणाऱ्या संधी या प्रत्येक भारतीयांसाठी आहेत. उद्धव ठाकरे, आम्हाला लोकशाहीनं दिलेला अधिकार हिरावण्याचा प्रयत्न करु नका. आम्हाला विभागण्याचा प्रयत्न करु नका. तुमची भाषणं तुमची अकार्यक्षमता दाखवतात.” अशा शब्दांत कंगनाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर ट्विटरवरुन हल्ला चढवला. (Actress kangana Ranavat answer to CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्र्यांचा कंगना रनौतवर हल्लाबोल

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात कंगनाला चांगलंच फैलावर घेतलं. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान आहे. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायंचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची. मुंबईत अनधिकृत बांधकामं करायची. हिंमत असेल तर पाकव्यात काश्मीर सोडा. काश्मीरमध्ये अधिकृत बांधकाम करुन दाखवा, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी कंगनावर जोरदार प्रहार केला होता.

संबंधित बातम्या:

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या लेटर वॉरमध्ये कंगनाची उडी, ठाकरे सरकराला ‘गुंडा’ची उपमा

मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी असेल तर हे मोदींचच अपयश; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबईची पाकिस्तानशी तुलना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कंगनाला नाव न घेता झापले!

Actress kangana Ranavat answer to CM Uddhav Thackeray

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.