मुंबईची पाकिस्तानशी तुलना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कंगनाला नाव न घेता झापले!

मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सर्वच राजकीय विषयांवर टीका केली. (CM Uddhav Thackeray Criticism Kangana Ranaut) 

मुंबईची पाकिस्तानशी तुलना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कंगनाला नाव न घेता झापले!

मुंबई : “मुंबई आणि महाराष्ट्राच मीठ खायचं आणि पुन्हा महाराष्ट्राची बदनामी करायची. महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु आहेत. महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनामी केली जात आहे,” अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अभिनेत्री कंगना रनौतचं नाव न घेता दिली. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सर्वच राजकीय विषयांवर टीका केली. (CM Uddhav Thackeray Criticism Kangana Ranaut)

मुंबई पाकव्याप्त काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर सोडून द्या, मोदींनी २०१४ ला सांगितलं होतं की पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू. ते लांब राहिलं. पण ३७० कलम काढलं आहे. त्यानंतर तुम्ही आज तरी अधिकृत एक इंच जमीन काश्मीरमध्ये घेऊन दाखवा. मग आमच्या अंगावर या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत महाराष्ट्रात यायचं आणि नंतर दाखवायचं की आम्ही कष्ट केले आहे. मुंबई, महाराष्ट्राचं मीठं खायचं आणि नमक हरामी करायची ही असली रावणी औलाद, महाराष्ट्राची बदनामी कशासाठी करायाची. महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु आहेत. महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनामी केली जात आहे, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

मुंबई पाकव्याप्त काश्मीर मुंबई पोलिस काही काम करत नाही, शिवाजी पार्कात गांजा चरसची शेती आहेत, चरस गांजा उघड विकला जातो. पण त्यांना हे माहिती नाही महाराष्ट्राच्या संस्कृतीत घरासमोर तुळसी वृदांवन आहेत. गांजाची वृदांवन नाहीत. ते तुमच्या घरी गांजाची शेती असेल, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी कंगनाला लगावला.

मी मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचाही कुटुंबप्रमुख आहे. मला त्या पोलीस दलाबद्दल अभिमान आहे. जगातील पोलीस दलात असे एकमेव पोलीस दल आहे, ज्यांनी अंगावर गोळ्या घेऊन अतिरेक्याला पकडलं आहे. केवळ महाराष्ट्र पुढे जातो म्हणून पोलिसांना बदनाम केलं जात आहे. मुंबई पाकव्यापत काश्मीर झालं, असं बोलणं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान आहे. ते पंतप्रधानांचं अपयश आहे. त्या राज्याचा नाही, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलं.

“हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा”

“अनेक जण तारीख पे तारीख देतात. अनेक जण स्वप्न बघतात. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही गुळाच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे नाही. जर वाटेला जालं, तर मुंगळा कसा डसतो तेही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. मी वाघाची औलाद आहे, त्याला जर डिवचले तर काय होतं त्याचे इतिहासात दाखले आहे. भविष्यातही पाहायला मिळतील,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याला आडवा करुन गुढीपाडवा उभारण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. बेडकाच्या पिलाने वाघ पाहिला, वाघ पाहून तो लपला,” अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंसह त्यांच्या पुत्रांवर जोरदार टीका केली. (CM Uddhav Thackeray Criticism Kangana Ranaut)

संबंधित बातम्या : 

CM Uddhav Thackeray Speech | कळसूत्री बाहुल्यांचा खेळ संपवला, यापुढे राज्यात मर्द मावळ्यांचं सरकार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बेडूक आणि त्याची पिल्लं वाघ पाहून ओरडत सुटलेत; उद्धव ठाकरेंचा राणे कुटुंबीयांवर प्रहार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *