लग्नानंतर अनिल कपूर यांची पत्नी एकटीच गेलेली हनीमूनला, अभिनेत्यानं सांगितला किस्सा; बायकोनं..
Anil Kapoor On Wife Sunita Kapoor : अनिल कपूरनं त्याच्या कार्यक्रमात पत्नी सुनीता कपूरचा किस्सा सांगितला आहे. याबाबत पहिल्यांदाच बोलताना अनिल कपूर हे दिसले आहेत.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर ‘इंडियाज टॉप 1 परसेंट: द अनिल कपूर शो’ या गेम शोचं सूत्रसंचालन करत आहे. हा शो स्टार प्लसवर प्रसारित होत असून नुकत्याच एका एपिसोडमध्ये, एका स्पर्धकाशी बोलताना अनिलनं आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक किस्सा सांगितला. अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांची प्रेमकथा अगदीच फिल्मी पद्धतीनं सुरू झाली. अनिल आणि सुनीता यांच्या रिलेशनशिपची सुरुवात एका प्रँक कॉलनं झाली आणि त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करत होते. अभिनेत्यानं सांगितलं की, त्याची पत्नी सुनीता कपूर एकदा एकटीच हनिमूनला गेली होती. इतकंच नाही, तर सुनीतानं लग्नाआधी एक अटही घातली होती.
लग्नानंतर सुनीता एकटीच हनिमूनला गेली
स्पर्धाकाशी बोलताना कंगना रणौतच्या ‘क्वीन’ चित्रपटाचा उल्लेख करण्यात आला. यावेळी, अनिल कपूरला त्याची पत्नी सुनीताचा किस्सा आठवला. अनिल कपूर म्हणाला की, ‘सुनीता हनिमूनला एकटीच गेली होती, मी तिच्यासोबत जाऊ शकलो नव्हतो. सुनीता माझी राणी आहे आणि नेहमीच राहील.’
सुनीता कपूरनं लग्नाआधी घातलेली अट
शोमध्ये अनिल कपूरनं सुनीतानं त्याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी ठेवलेल्या अटीचा उल्लेख केला. अभिनेत्यानं खुलासा केला की, सुनीतानं स्वयंपाकघरात जाण्यास नकार दिला होता. अनिल म्हणाला, ‘माझी पत्नी सुनीतानं एक अट घातली होती. तिला स्वयंपाकघरात काम करायचं नव्हतं आणि त्या एका अटीवरच ती लग्नासाठी होकार देणार होती. तिची अट ऐकल्यावर मला वाटलं की, मला इतकी मेहनत करावी लागेल आणि इतकं यशस्वी व्हावं लागेल की, तिला स्वयंपाकघरात जाण्याची कधीच गरज भासणार नाही. मी ती जबाबदारी स्वीकारली आणि आजपर्यंत सुनीता कधीही स्वयंपाकघरात गेली नाही.’
दरम्यान, अनिल कपूरनं 9 मे 1984 रोजी सुनीता कपूर यांच्याशी लग्न केलं. या जोडप्याला सोनम कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर अशी तीन मुलं असून अभिनेत्याच्या लग्नाला 42 वर्षे झाली आहेत. अनिल कपूरच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यानं ‘मशाल’, ‘मेरी जंग’, ‘महोब्बत’, ‘मिस्टर इंडिया’, ‘ठिकाना’, ‘कसम’, ‘तेझाब’, ‘परिंदा’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
