Ankita Lokhande: आरतीचा असा तमाशा का? ही वेडी झालीये का? अंकिता लोखंडेच्या वागण्यावर भडकले नेटकरी
Ankita Lokhande: अर्जुन बिजलानीच्या घरी गणपतीच्या आरतीनंतर मंत्रपुष्पांजली म्हणताना अंकिता लोखंडेचा अतिउत्साह पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही वेडी झालीये का, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात सेलिब्रिटींच्या घरातील बाप्पाचं दर्शन आणि आरतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. टेलिव्हिजन अभिनेता अर्जुन बिजलानीच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या गणपती आरतीलाही मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांचाही समावेश होता. या सोहळ्यातील काही व्हिडीओ समोर आल्यानंतर अंकिताच्या वागण्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आता समोर आलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये अंकिता मंत्रपुष्पांजली म्हणताना दिसत आहे. सुरुवातीला ती मोठ्या उत्साहाने मंत्र म्हणण्यास सुरुवात करते. मात्र, पुढची ओळ म्हणताना ती अचानक थांबते आणि शब्द आठवत नसल्यासारखी दिसते.
अंकिताच्या या क्षणाकडे अर्जुन बिजलानीही पाहताना आणि हसताना दिसतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही युजर्सनी तिच्या वागण्याला ‘अतिउत्साह’ म्हटलं आहे. तर काहींनी ‘आरतीचा असा तमाशा का?’, ‘ही वेडी झालीये का?’ अशा स्वरूपाच्या कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वीच्या व्हिडीओवरही काही युजर्सनी ‘अंकिताला झालंय तरी काय?’ आणि ‘ती ठीक आहे का?’ असे सवाल केले होते.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
यापूर्वीही अर्जुनच्या घरी झालेल्या आरतीतील अंकिताचा एक व्हिडीओ चर्चेत आला होता. त्यामध्ये ती आरतीदरम्यान उत्साहात डुलताना, हावभाव करताना आणि नंतर नाचताना दिसली होती. या व्हिडीओवर काही चाहत्यांनी तिच्या उत्साहाचं कौतुक केलं, तर काही नेटकऱ्यांनी मात्र तिच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केले.
अर्जुन बिजलानीच्या घरी गणपती उत्सवानिमित्त अनेक टीव्ही कलाकार एकत्र आले होते. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनीही या सोहळ्यात सहभाग घेत बाप्पाचं दर्शन घेतले. या कार्यक्रमातील कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ पापराझी तसंच सोशल मीडिया अकाउंट्सवरून मोठ्या प्रमाणात शेअर झाले. आता मंत्रपुष्पांजली म्हणतानाचा अंकिताचा हा नवा व्हिडीओ चर्चेत आल्याने तिच्या चाहत्यांसह सोशल मीडिया युजर्सचं लक्ष पुन्हा तिच्या अशा वागण्याकडे वेधलं गेलं आहे.
