भजनसम्राट अनुप जलोटा अभिनयाच्या क्षेत्रात, सत्य साई बाबांचा डिट्टो लूक!

भजनसम्राट अनूप जलोटाने (Anup Jalota) सत्य साई बाबाच्या यांच्यावर आधारीत असलेला चित्रपट साइन केला आहे.

भजनसम्राट अनुप जलोटा अभिनयाच्या क्षेत्रात, सत्य साई बाबांचा डिट्टो लूक!

मुंबई : भजनसम्राट अनुप जलोटाने  (Anup Jalota) सत्य साई बाबांवर आधारीत असलेला चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात अनूप जलोटा हे सत्य साई बाबांची भूमिका साकारणार आहेत. सत्य साई बाबांची भूमिका करायला मिळत असल्यामुळे अनूप जलोटा खूप आनंदी आहे. त्यांनी सत्य साई बाबांसारखा गेटअप करून काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. त्या फोटोत अनूप जलोटा हे हुबेहुब सत्य साई बाबांसारखे दिसत आहेत. अनूप जलोटा आध्यात्मिक गुरु सत्य साई बाबाच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अनूप जलोटा हे मुख्य भूमिकेत आहे. (Anup Jalota will make his acting debut)

या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्की रनौत करत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आले होते आणि आता अनूप जलोटाच्या या लूकची खूप चर्चा होत आहे. अनूप जलोटाने सत्य साई बाबांसारखा गेटअप करून काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे हे फोटो शेअर करताना लिहिले की, मला खूप आनंद आहे मी सत्य साई बाबा यांची भूमिका साकारणार आहे. कारण मी त्यांचे सिध्दांत आणि आदर्श मानतो. मी त्यांच्याबद्दल अभ्यास केला आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, गोविंद नामदेव, अरुण बक्षी आणि साधिका रंधावा हे अभिनेतेही दिसणार आहेत.

संबंधित बातम्या :

Boney Kapoor : बोनी कपूर यांना यापूर्वीही चित्रपटाची ऑफर, ‘या’ चित्रपटात मिळाली होती खास भूमिका

Nepotism : घे भरारी! सुष्मिता सेनचा लाडक्या लेकीला मोलाचा सल्ला

‘धाकड’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कंगनाविरोधात जोरदार आंदोलन, लोक म्हणाले परत जा, परत जा…!

(Anup Jalota will make his acting debut)

Published On - 10:29 am, Wed, 13 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI