AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anupamaa: अनुपमा-अनुजचा किसिंग सीन लीक; रोमान्स पाहून चाहत्यांना बसला शॉक!

'अनुपमा' मालिकेत पहिल्यांदाच इंटिमेट किसिंग सीन, TRP साठी अनुज-अनुपमाने उचललं पाऊल; चाहते थक्क!

Anupamaa: अनुपमा-अनुजचा किसिंग सीन लीक; रोमान्स पाहून चाहत्यांना बसला शॉक!
अनुपमा-अनुजचा किसिंग सीन लीक; रोमान्स पाहून चाहत्यांना बसला शॉक!Image Credit source: Twitter
| Updated on: Jan 09, 2023 | 9:38 AM
Share

मुंबई: स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ ही मालिका टीआरपीच्या यादीत नेहमीच अग्रस्थानी असते. आपल्या कुटुंबीयांची प्रत्येक जबाबदारी पार पाडत असताना स्वत:कडे दुर्लक्ष झालेल्या अनुपमा या गृहिणीची कहाणी यात दाखवण्यात येत आहे. गेल्या काही काळात या मालिकेच्या कथेत बरेच बदल झाले. अनुपमा आता स्वावलंबी आणि स्वत:साठी निर्णय घेणारी महिला झाल्याचं दाखवण्यात येतंय. मात्र मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मोठा धक्काच बसणार आहे. कारण पहिल्यांदाच अनुपमा आणि अनुज यांचा इंटिमेट किसिंग सीन दाखवण्यात येणार आहे.

अनुपमा आणि अनुजचा रोमान्स

अनुपमा आणि अनुज यांचा हा किसिंग सीन लीक झाला आहे. मालिकेच्या कथेत गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरु होते. हा तणाव विसरून नवीन सुरुवात करण्यासाठी अनुपमाने सरप्राइज रोमँटिक डेट प्लॅन केला आहे. अनुपमाला अनुजसोबतच्या नात्याची नवी सुरुवात करायची आहे आणि यात ती यशस्वी ठरली आहे.

या मालिकेत अनुज आणि अनुपमा पहिल्यांदाच इंटिमेट झाले आहेत. त्यामुळे या एपिसोडमध्ये मालिकेच्या टीआरपीत मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अनुज आणि अनुपमाच्या सिझलिंग केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

अनुपमा या मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुली अनुपमाची तर अभिनेता गौरव खन्ना हा अनुजची भूमिका साकारतोय. या मालिकेत मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना हे मालिकेत रोमँटिक सीन करणार नाहीत, असा चाहत्यांचा अंदाज होता. मात्र मालिकेत हे नवं वळण आणत निर्मात्यांनी चाहत्यांना मोठा धक्काच दिला आहे.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार