मराठी अभिनेत्रीला 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडने प्रपोज करताच एक्स गर्लफ्रेंडचा टोमणा; नेटकरी म्हणाले ‘तिला मूव्ह-ऑन होण्याची गरज..’

बिग बॉसच्या घरात हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. आता नुकतंच अभिनेत्याने गुडघ्यावर बसून तिला लग्नासाठी प्रपोज केलं आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होताच एक्स गर्लफ्रेंडने इन्स्टा स्टोरीमध्ये क्रिप्टिक पोस्ट लिहिली आहे.

मराठी अभिनेत्रीला 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडने प्रपोज करताच एक्स गर्लफ्रेंडचा टोमणा; नेटकरी म्हणाले तिला मूव्ह-ऑन होण्याची गरज..
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडी
Image Credit source: Instagram
| Updated on: May 21, 2026 | 10:20 AM

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश सध्या तुफान चर्चेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. इतकंच नव्हे तर लवकरच करण आणि तेजस्वी लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा होती. या चर्चांदरम्यान अखेर करणने तेजस्वीला लग्नासाठी प्रपोज केलं आहे. या प्रपोजलनंतर मात्र करणची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अनुषा दांडेकरने लिहिलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या क्रिप्टिक पोस्टनंतर नेटकरी अनुषाला ट्रोल करत आहेत. तिला आता आयुष्यात मूव्ह ऑन होण्याची खूप गरज आहे, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. बिग बॉसच्या घरात हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि हळूहळू त्यांची प्रेमकहाणी लग्नाच्या पायरीपर्यंत पोहोचत आहे. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ‘देसी ब्लिंग’ या शोच्या सेटवर करणने तेजस्वीला प्रपोज केलं. प्रपोजलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यादरम्यान करणची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरने तिच्या सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट लिहिली आहे. ‘मी देवाचे आभार मानते, जर तुम्हाला माहीत असेल तर माहीत असेल’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. यावरून नेटकऱ्यांनी अनुषालाच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

अनुषा दांडेकरची पोस्ट-

‘तुझ्याकडून अशा पोस्टची अपेक्षा नव्हती. आम्ही तुला समजूतदार समजत होतो. इतकी वर्षे झाले, मग आता का हे लिहिलं’, असा सवाल एका युजरने केला. तर ‘एखाद्याच्या खास दिवशी असं काही करणं म्हणजे अत्यंत वाईट आहे’, अशा शब्दांत दुसऱ्याने सुनावलं. ‘तुला कदाचित त्यांची जोडी आवडत नसेल, पण त्यांच्या खास दिवशी असं करणं खूपच खालच्या पातळीचं आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी अनुषावर टीका केली. काहींनी अनुषाला ‘मूव्ह ऑन’ होण्याचा म्हणजेच आयुष्यात पुढे जाण्याचाही सल्ला दिला.

करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर हे 2015 पासून एकमेकांना डेट करत होते. परंतु डेटिंगच्या पाच वर्षांनंतर 2020 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअपनंतर अनुषाने अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये फसवणुकीचा उल्लेख केल्याने त्याची खूप चर्चा झाली होती. तर करणने वारंवार फसणुवकीचे आरोप फेटाळले होते.

Follow Us