Virat Anushka: विराट-अनुष्का अलिबागमध्ये बांधणार आलिशान फार्महाऊस; किंमत वाचून विस्फारतील डोळे!

आशिया कप स्पर्धेतील सामन्यांसाठी विराट सध्या दुबईत आहे. त्यामुळे त्याचा छोटा भाऊ विकास कोहली याने जमिनीच्या कराराशी संबंधित जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.

Virat Anushka: विराट-अनुष्का अलिबागमध्ये बांधणार आलिशान फार्महाऊस; किंमत वाचून विस्फारतील डोळे!
Virat Anushka: विराट-अनुष्का अलिबागमध्ये बांधणार आलिशान फार्महाऊस
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 02, 2022 | 1:18 PM

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) हे सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक आहेत. सोशल मीडियावर या दोघांवर नेहमीच चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत असतो. 11 डिसेंबर 2017 रोजी विराट-अनुष्काने इटलीत लग्नगाठ बांधली. डेटिंग लाईफपासून ते आतापर्यंत, या दोघांच्या खासगी आयुष्यातील प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी घेतलेली नवीन प्रॉपर्टी. ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार विराट-अनुष्काने गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर अलिबागमध्ये (Alibaug) आठ एकर जमीन खरेदी केली आहे. या जमिनीवर विरुष्का फार्महाऊस बांधणार आहेत. या फार्महाऊसची किंमत तब्बल 19 कोटी 24 लाख 50 हजार रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी दोघांनी सरकारी खजिन्यात 1 कोटी 15 लाख रुपये रक्कम जमा केली आहे.

विराट आणि अनुष्का सहा महिन्यांआधी ही जमीन पाहण्यासाठी अलिबागला गेले होते. अखेर 30 ऑगस्ट रोजी दोघांनी जमिनीचा करार पक्का केला. आशिया कप स्पर्धेतील सामन्यांसाठी विराट सध्या दुबईत आहे. त्यामुळे त्याचा छोटा भाऊ विकास कोहली याने जमिनीच्या कराराशी संबंधित जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. याआधी क्रिकेटविश्वातील दिग्गज रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांनीसुद्धा अलिबागमध्ये फार्महाऊस विकत घेतला होता.

अलिबागच्या बंगल्यासोबतच विराटने दिवंगत गायक किशोर कुमार यांच्या मुंबईतील जुहूमधल्या बंगल्याचा एक भागसुद्धा भाडेतत्त्वावर घेतला आहे. या जागी तो रेस्टॉरंट उभारणार असल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून या रेस्टॉरंटच्या इंटेरियरचं काम सुरू आहे. पुढील महिन्यात हा रेस्टॉरंट ग्राहकांसाठी खुला होऊ शकतो.