AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किती जाड, वयस्कर दिसते ही.., महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याकडून ट्रोलिंग, अपूर्वा नेमळेकर संतापली

Apurva Nemlekar: किती जाड आणि वयस्कर दिसते ही अपूर्वा म्हातारी.. असं म्हणत ट्रोल करणाऱ्या महिलेला अपूर्वा नेमळेकरने चांगलंच सुनावलं आहे. महिलेचं नाव आणि तिची ओळख उघड करत अपूर्वाने ही विकृती असल्याचं म्हटलं आहे.

किती जाड, वयस्कर दिसते ही.., महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याकडून ट्रोलिंग, अपूर्वा नेमळेकर संतापली
अपूर्वा नेमळेकर आणि तिचा पतीImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2026 | 8:13 AM
Share

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पतीसोबत विविध रील्स आणि फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र अशाच एका पोस्टवर तिच्या दिसण्यावरून एका युजरने अत्यंत वाईट कमेंट केली. ‘किती जाड-वयस्कर दिसते, लहान वयाच्या मुलासोबत लग्न केलं’, असं म्हणत अपूर्वाला एका महिलेनं ट्रोल केलं. या ट्रोलिंगनंतर अपूर्वाने ‘मला फरक पडत नाही, पण ही विकृती आहे’, असं म्हणत संबंधित महिलेला चांगलंच सुनावलं होतं. त्यानंतर आता अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्रामवर आणखी एक पोस्ट लिहिली आहे. ‘जेव्हा एक बाईच दुसऱ्या बाईला खाली खेचण्याचा प्रयत्न करते, तेव्हा जास्त वाईट वाटतं’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

अपूर्वा नेमळेकरची पोस्ट-

‘माझ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी.. मनापासून काहीतरी.. गेल्या काही दिवसांत घडलेल्या प्रसंगावर एका बाईने माझ्याबद्दल जी वाईट कमेंट केली, त्यामुळे मी जितकी दुखावले गेले, त्याहून अधिक त्रास माझ्या प्रेक्षकांना झाला हे मी पाहिलं. मीडियानेही याची दखल घेतली आणि अनेकांनी मला इग्नोर कर असा प्रेमाचा सल्ला देत धीर दिला. या संपूर्ण प्रकरणात दोन गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या. पहिली- समाजात वाईट वृत्तीचे लोक असतातच आणि जेव्हा एक बाईच दुसऱ्या बाईला खाली खेचण्याचा प्रयत्न करते, तेव्हा जास्त वाईट वाटतं. पण दुसरी आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमचं माझ्यावर असलेलं अथांग आणि नि:स्वार्थ प्रेम,’ अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

या पोस्टमध्ये तिने पुढे म्हटलंय, ‘फेसबुक असो किंवा इन्स्टाग्राम मी स्वत: तुमचे पाठवलेले मेसेज वाचले आणि शक्य तितक्या प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तुमचं हे पाठबळ बघून अक्षरश: माझं मन भरून आलंय. आज मला जाणीव झाली की तुम्ही माझ्याकडून किती अपेक्षा ठेवता आणि म्हणूनच माझी जबाबदारी आता अजून वाढली आहे. मी तुमची आयुष्यभरासाठी ऋणी आहे. तुमचं हे प्रेम असंच कायम राहो. मी वचन देते.. वेगवेगळ्या माध्यमातून आणि नवनवीन कलाकृतींमधून तुम्हा सगळ्यांचं निरंतर मनोरंजन करत राहीन. मनापासून खूप खूप प्रेम आणि कृतज्ञता.’

‘या ज्या व्यक्ती आहेत, त्यांचं नाव राजश्री विरनक असं आहे. त्या ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत. एवढ्या जबाबदार प्रशासकीय यंत्रणेत आणि महत्त्वाच्या विभागात एका पदावर काम करत असताना, त्यांच्याकडून किमान नागरी भान आणि नैतिक जबाबदारीची अपेक्षा असते. एका शासकीय सेवेत असलेल्या सुशिक्षित व्यक्तीने सार्वजनिक किंवा सोशल मीडियावर अशा प्रकारची भूमिका घेणे हे खरंच धक्कादायक आहे,’ असंही तिने पुढे म्हटलंय.

ट्रोलरची कमेंट-

‘किती जाड आणि वयस्कर दिसते ही अपूर्वा म्हातारी.. मेकअपमुळे बरी दिसते नाहीतर चेहरा हिचा लूज पडलेला आहे. नशीब लहान वयाच्या मुलासोबत लग्न केलं. हिचं पंचवीस वर्षांपूर्वी लग्न झालं असतं तर हिचा मुलगा आता नवरा केला त्याच्या वयाचा असता. ठीक आहे, लहान तर लहान लग्नाची हौसतर झाली. नवरोबाची आई वाटते ही.. नुसतं सुंदर असूनही उपयोग नाही. शेवटी नशीब’, अशी कमेंट राजश्री विरनक यांनी केली होती.

Follow Us
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग...
नवनीत राणांचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन, आधी लाऊडस्पीकरवर ठेवला मग अचानक बंद का केला ??
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...