AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arijit Singh Post : रिटायरमेंटवरून अरिजीत सिंगची पलटी ? ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

Singer Arijit Singh : अरिजीत सिंगने गेल्या महिन्यातच प्लेबॅक सिंगीगमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र आता सुमारे महिन्याभरानंतर सोशल मीडियावर त्याने आणखी एक पोस्ट केली आहे. त्याने चाहत्यांसाठी एक खास मेसेज शेअर केलाय.

Arijit Singh Post : रिटायरमेंटवरून अरिजीत सिंगची पलटी ? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण
अरिजीत सिंग
| Updated on: Feb 25, 2026 | 10:57 AM
Share

Singer Arijit Singh : प्लेबॅक सिंगींग मधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सुमारे 1 महिन्याभराने प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शए्र करत चाहत्यांसमोर मनातील विचार मांडले आहेत. या पोस्टनंतर सोशल मीडिया यूजर्सकडून अनेक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, अरिजीत सिंग त्याच्या निवृत्तीचा निर्णय मागे घेणार की काय अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. अरिजीतने त्याच्या पोस्टमध्ये एक अशी ओळ लिहिल्ये की, त्यामुळे युजर्सनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अरिजीतने त्याच्या पोस्टमध्ये असं म्हटलं तरी काय ?

“हा संदेश फक्त माझ्या श्रोत्यांसाठी आहे. जर तुम्ही माझे श्रोते नसाल तर कृपया हे वाचू नका आणि लगेच स्वाइप करा. ही एक नम्र विनंती आहे. नमस्कार, प्रियजनांनो! मी सर्वांना सांगू इच्छितो की मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो. या क्रूर जगात तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. मी नवीन असाइनमेंट घेणे बंद केले आहे, पण तुम्हाला तर माहीत आहेच की पेंडिंग गाण्यांची यादी कमी नाही. मला अजूनही बरीच गाणी पूर्ण करायची आहेत.” असं अरिजीतने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

वर्षभर येत राहणार अरिजीतची गाणी

पुढे तो म्हणाला, “लोकांना पटवून देण्यात वेळ वाया घालवू नका, तुम्ही किती वेळा समजावून सांगाल ? अशी अनेक अपूर्ण गाणी आहेत जी पूर्ण होईपर्यंत रिलीज होत राहतील. कदाचित वर्षभर. कदाचित पुढच्या वर्षीही. शांत राहा. या व्यासपीठापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या शरीरातून स्पाइक प्रोटीन काढून टाका, 5 ग्रॅम सोडून द्या, वाचा, प्रेम करा आणि मेडिटेशन करा.” असा संपूर्ण मेसेज त्याने चाहत्यांसाठी लिहीला आहे.

निवृत्तीवरून माघार घेण्याचा अंदाज का ?

अरिजीतच्या पोस्टमध्ये इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण पुढे त्याने असं काही लिहीलं, की ते वाचून अनेक लोकांनी तो परत येणार असल्याचा, रिटायरमेंट परत घेणार असल्याता अंदाज व्यक्त केला. कारण अरिजीतने पुढे लिहीलं होतं की, “पुढे काय होईल कोणाला माहित?.”. बास्स. त्याची हीच ओळ सर्वा चाहत्यांनी वाचली आणि चर्चांना उधाण आलं. अरिजीत कदाचित निवृत्त मागे घेऊ शकतो असंच सर्वांना वाटू लागलं.

गेल्या महिन्यात, 28 जानेवारी रोजी अरिजीतने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून निवृत्तीची घोषणा केली होती. प्लेबॅक सिगिंगमधून संन्यास घेत असल्याचं त्याने जाहीर केलं. मात्र या बातमीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला, अनेकांचा त्यावर विश्वासच बसतच नव्हता. पण ाता त्याच्या नव्या पोस्टमुळे लोकांच्या मनात पुन्हा आशा पल्लवित झाली आहे.

Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?