
नात्यात असताना देखील आणि ब्रेकअप झाल्यावही चर्चेत अणारं कपल म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. यांचे ब्रेकअप होऊन बराच काळ लोटला आहे. दोघांनीही अधिकृतपणे त्यांचे नाते संपुष्टात आल्याची घोषणाही केली आहे. पण तरी देखील चाहत्यांना या जोडीने पुन्हा एकत्र यावं अशी इच्छा आहे. मलायकासोबत ब्रेक झालं असलं तरीदेखील अर्जुन आणि मलायका एकमेकांची काळजी घेतात आणि वाईट काळात एकमेकांना साथ देताना देखील दिसतात.तसेच सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट करताना दिसतात. आता देखील हे दोघे एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये दोघांनीही अशी काही पोस्ट केली आहे की नेटकरी देखील गोंधळले आहेत.
अर्जुन कपूरने पोस्ट शेअर केली
अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांपासून त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर सतत गूढ पोस्ट शेअर करत असतो. अर्जुन कपूरने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेणारी पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याने लिहिले आहे की, ‘कधीतरी हे समजेल.’ आता तो इथे कशाबद्दल बोलत आहे? हे फक्त अर्जुनलाच माहिती आहे, पण त्यानंतर लगेच मलायकाने देखील एक पोस्ट केली ज्यामुळे असे वाटत आहे की दोघेही एकमेकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
मलायकाच्या पोस्टचा आणि अर्जुनचा काही संबंध आहे का?
मलायका अरोराने पोस्टमध्ये लिहिलं आहे की ‘तुम्हाला जे आनंद देतं ते करा, हे दिवस परत येणार नाहीत.’ आता मलायका अरोराची ही पोस्ट पाहून ती अर्जुनला काहीतरी सांगू पाहतेय असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. दोघांच्याही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अर्जुन कपूरच्या गूढ पोस्ट वाढतच आहेत.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचं ब्रेकअप का झालं? याचा खुलासा आजपर्यंत झालेला नाही? दोघांनीही त्यांच्या लव्ह लाईफबद्दल कोणालाही काही सांगितले नाही. तथापि, अर्जुन कपूर गेल्या काही काळापासून उदास दिसत आहे. तो सोशल मीडियावर गूढ पोस्ट शेअर करून सतत त्याच्या भावना व्यक्त करत आहे.