AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या ५० व्या वर्षी बॉलिवूड अभिनेता झाला चौथ्यांदा बाबा; लग्नाआधी गर्लफ्रेंडने दिला दुसऱ्या बाळाला जन्म

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन.. ५० व्या वर्षी अभिनेत्याच्या ३६ वर्षीय गर्लफ्रेंडने दिला दुसऱ्या बाळाला जन्म, खुद्द अभिनेत्याने व्यक्त केला आनंद

वयाच्या ५० व्या वर्षी बॉलिवूड अभिनेता झाला चौथ्यांदा बाबा; लग्नाआधी गर्लफ्रेंडने दिला दुसऱ्या बाळाला जन्म
| Updated on: Jul 21, 2023 | 10:29 AM
Share

मुंबई | 21 जुलै 2023 : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी चाळीशी ओलांडल्यानंतर लग्न केलं आणि नवा संसार थाटला. पण बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता तर लग्न न करता वयाच्या ५० व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. खुद्द अभिनेत्याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एवढंच नाही तर अनेकांनी अभिनेत्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सध्या सर्वत्र अभिनेता आणि त्याच्या खासगी आयु्ष्याची चर्चा रंगत आहे. सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता अर्जुन रामपाल आहे.

वयाच्या ५० व्या वर्षी अभिनेता चौथ्यांदा बाबा झाला आहे. अर्जुन याची गर्लफ्रेंड आणि साउथ अफ्रीकन मॉडेल गॅब्रिएला हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. अर्जुन याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आनंद शेअर केला आहे.

एका टॉवेलचा फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘मी आणि माझ्या कुटुंबाने आमच्या मुलाचं स्वागत केलं आहे. गॅब्रिएला आणि बाळ यांची प्रकृती स्थिर आहे.’ एवढंच नाही तर अभिनेत्याने डॉक्टर आणि नर्स यांचे देखील आभार मानले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Arjun Rampal (@rampal72)

अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि प्रसिद्धीझोतात आला. पण आता अभिनेता गर्लफ्रेंड गॅब्रिएला (gabriella demetriades) हिच्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला दुसऱ्यांदा आई झाली आहे.

गॅब्रिएला आणि अर्जुन रामपाल यांची भेट आयपीएल पार्टीदरम्यान झाली होती. यानंतर, दोघांच्या मैत्रीचे हळूहळू भेटीत रुपांतर झाले आणि 2019 मध्ये दोघांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र, अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी लग्न केलं नाही. गेल्या काही वर्षांपासून अर्जुन आणि गॅब्रिएला एकत्र आहेत. पण दोघांनी अद्याप लग्न केलेलं नाही.

गॅब्रिएला आणि अर्जुन रामपाल कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. अर्जुन याचं पहिलं लग्न मेहर जेसिका हिच्यासोबत झालं होतं. दोघे जवळपास २० वर्ष एकत्र होते. अर्जुन आणि मेहर यांना दोन मुली देखील आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...