AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan : डायरेक्शननंतर आर्यन खानची नवी तयारी, काय करतोय आता किंग खानचा मुलगा ?

आर्यन खान आता नव्या कामाला लागला आहे. तो नव्या लेखकांच्या शोधात आहे. काय आहे त्याचं नवं व्हेंचर?

Aryan Khan : डायरेक्शननंतर आर्यन खानची नवी तयारी, काय करतोय आता किंग खानचा मुलगा ?
| Updated on: Oct 23, 2026 | 5:56 PM
Share

Aryan Khan: बॉलिवूडचा बादशाह, अर्थात शाहरुख खानचा मुलगा, आर्यन खान याने आता स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आर्यन खान आता रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन कंपनीसाठी नवीन लेखक जोडण्याच्या तयारीत आहे. व्हरायटी इंडियाच्या रिपोर्टनुसार, आर्यन लहान लेखकांच्या शोधात आहे आणि आपल्या येणाऱ्या चित्रपटांसाठी आणि वेब सिरीजसाठी नवीन टॅलेंटची टीम तयार करत आहेत. द बॅड्स ऑफ बॉलिवूड या त्याच्या पहिल्या सिरीजला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर, आर्यनला आता प्रोडक्शन हाऊसच्या पुढच्या स्ट्रिमिंग सिरीजची कथा लिहिण्यातही स्वतः सहभागी होण्याची इच्छा आहे.

मात्र, आगामी सीरिजबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. वृत्तानुसार, आर्यन अशा नव्या लेखकांच्या शोधात आहे, जे कथा एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडू शकतील आणि आजच्या काळाशी सुसंगत लेखन करू शकतील. या उपक्रमाचा उद्देश रेड चिलीज एंटरटेनमेंटसाठी लेखकांचा एक असा समूह तयार करणं आहे, ज्यातून भविष्यातील प्रोजेक्ट्ससाठी प्रतिभावान लेखकांची निवड करता येईल.

आर्यन स्वतःही लागला कामाला; नव्या सीरिजसाठी जोरदार तयारी

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी सीरिजच्या लेखनप्रक्रियेत आर्यन स्वतःही सक्रिय भूमिका बजावणार आहे. म्हणजेच, त्याला केवळ दिग्दर्शन आणि क्रिएटिव्ह कामापुरतं मर्यादित राहायचं नाही, तर कथेच्या निर्मितीतही योगदान द्यायचं आहे. वृत्तानुसार, आर्यन सध्या अनेक स्क्रिप्ट्स वाचत असून क्रिएटिव्ह डायरेक्टर्सच्या एका टीमसोबत काम करत आहे. ही टीम आजच्या तरुणांचं जीवन, त्यांची नाती आणि बदलती विचारसरणी यांच्याशी संबंधित कथांचा शोध घेत आहे. तरुणांचे अनुभव पडद्यावर अधिक प्रभावीपणे मांडू शकतील, अशा नव्या कथा आणि लेखक शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढे या कथांचं रूपांतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठीच्या प्रोजेक्ट्समध्ये करता येईल.

‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ने गाजवलं होतं ओटीटी विश्व

‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजचा प्रीमियर सप्टेंबर 2025 मध्ये नेटफ्लिक्सवर झाला होता. या सीरिजच्या माध्यमातून आर्यन खानने क्रिएटर आणि दिग्दर्शक म्हणून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं होतं. गौरी खान यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या सीरिजची निर्मिती केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीवर उपरोधिक भाष्य करणाऱ्या या सीरिजमध्ये एका तरुण कलाकाराची कथा दाखवण्यात आली होती. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करताना त्याला चित्रपटसृष्टीतील राजकारण, परस्परांमधील संघर्ष आणि नातेसंबंधांमधील गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. ह्यूमर, ड्रामा आणि व्यंगात्मक पद्धतीने यात बॉलिवूड दाखवण्यात आलं होतं.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…