AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या मुस्लिमाला शिवी देऊ की नको..; ‘धुरंधर 2’ वर भडकले असदुद्दीन ओवैसी, रणवीरबद्दल म्हणाले..

Asaduddin Owaisi On Dhurandhar 2: एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2' या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना रणवीर सिंहच्या या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

या मुस्लिमाला शिवी देऊ की नको..; 'धुरंधर 2' वर भडकले असदुद्दीन ओवैसी, रणवीरबद्दल म्हणाले..
असदुद्दीन ओवैसी आणि रणवीर सिंहImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 29, 2026 | 8:24 AM
Share

Asaduddin Owaisi On Dhurandhar 2: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवे विक्रम रचतोय. थिएटर्सपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र फक्त याच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. परंतु रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं जितकं कौतुक होतंय, तितकीच त्यावर टीकासुद्धा होत आहे. हा चित्रपट प्रचारकी असल्याचं काहीजण म्हणत आहेत. त्यातच आता खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी चित्रपटावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ओवैसी यांनी या चित्रपटाला थेट ‘बकवास’ असं म्हटलं आहे.

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत असदुद्दीन ओवैसी यांना ‘धुरंधर’ या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “तो काही चित्रपट आहे का? एखाद्याला तीन तास पाहण्याइतका माझ्याकडे वेळ नाही. मला असं वाटतं की लोकांनी मला एक तास ऐकावं. तीन तास बकवास. त्यात असतं तरी काय, शिवीगाळ व्यतिरिक्त. हिंसेला प्रमोट करा आणि तीन तासांनंतर तुम्ही हे विचार करून बाहेर पडता की यार या मुस्लिमाला शिवी देऊ की नको. आता त्याला पाहून काय करणार, कोण बघणार?” पुढे ओवैसी यांना सांगितलं गेलं की संपूर्ण जगभरात हा चित्रपट पाहिला जातोय. त्यावर ते म्हणाले, “आम्ही हैदराबादीमध्ये म्हणतो की, प्यारे इन चीजों को दिल पर मत लो, गुर्दे पर लो. तो हम गुर्दे पर लेकर छोड देते हैं इसको. अडचण ही आहे की हे बकवास आहे.”

‘धुरंधर 2’ या चित्रपटात रणवीरसोबतच अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन आणि आर. माधवन यांच्या भूमिका आहेत. डिसेंबर 2025 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या पहिल्या भागाने जगभरात तब्बल 1300 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर 19 मार्च 2026 रोजी ‘धुरंधर 2’ हा दुसरा भाग प्रदर्शित झाला. गेल्या 9 दिवसांत या चित्रपटाने जगभरात 1100 कोटी रुपये कमावले आहेत.

या चित्रपटात भारतीय गुप्तहेराची कथा दाखवण्यात आली आहे. सत्य घटनांपासून प्रेरित ही कथा असल्याचा दावा केला जात आहे. रणवीरने त्यात हमजा अली मजारी आणि जसकीरत सिंह रंगी अशा दुहेरी छटा असलेल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या जबरदस्त अभिनयकौशल्याचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक होत आहे.

Follow Us
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं...
107 वर्ष जुन्या चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळासोबत अदाणी ग्रुपचं टायअप, यंदाचा गणेशोत्सव...
पुणे-सातारा महामार्ग रास्तारोको: सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद,
पुणे-सातारा महामार्ग रास्तारोको: सुप्रिया सुळेंचा आंदोलकांशी संवाद, प्रमुख तीन मागण्या काय?
मंत्र्याच्या जावयाला... भ्रष्टाचाराचं 'जामनेर पॅटर्न'; नाशिकसह महाराष्
मंत्र्याच्या जावयाला... भ्रष्टाचाराचं 'जामनेर पॅटर्न'; नाशिकसह महाराष्ट्रभरात... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
शिंदे गटाची इनकमिंग काही थांबेना! ठाकरे गटाला मोठा धक्का, धाराशिव...
शिंदे गटाची इनकमिंग काही थांबेना! ठाकरे गटाला दिला आणखी मोठा धक्का, धाराशिवच्या राजकारणात...
कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं... अखेर कपरे भरवणारी
कुणालच्या घरी गरिबी नाही भरपूर पैसा, मात्र बापानं... अखेर थरकाप उडवणारी माहिती समोर
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच..
मोठी बातमी! रोहित पवारांच्या PA च्या लेकीचा संशयास्पद मृत्यू, आईशीच... हादरवणारी माहिती समोर
कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनीची चक्रावणारी माहिती
खवड्या डोंगर: कुटुंबातील एकही व्यक्ती... कुणालच्या शेजाऱ्यांनी दिली चक्रावणारी माहिती, अखेरच्या चार महिन्यांमध्ये...
मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय...
मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर गंभीर गुन्हा दाखल, थेट शासकीय... नेमकं काय घडलं?
भुलेश्वरमधील गणेश मुर्ती अपघात प्रकरणी खळबळ जनक माहिती समोर, अचानक...
भुलेश्वरमधील गणेश मुर्ती अपघात प्रकरणी खळबळ जनक माहिती समोर, अचानक मुर्तीचा...
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप