AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Bhosle : दैवी आवाजासह हातालाही सुरेख चव.. आशा भोसलेंच्या जगभरातील रेस्टॉरंट्सबद्दल हे माहित आहे का ?

प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीतसृष्टीला धक्का बसला आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या केवळ एक महान गायिकाच नव्हे तर एक कुशल उद्योजिका आणि उत्कृष्ट अन्नपूर्णाही होत्या. त्यांच्या आवाजासोबतच, त्यांच्या हाताची चवही तितकीच खास होती. याच आवडीतून त्यांनी 'आशाज' ही आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंट साखळी सुरू केली, जिथे भारतीय पदार्थांना जगभरात ओळख मिळाली.

Asha Bhosle : दैवी आवाजासह हातालाही सुरेख चव.. आशा भोसलेंच्या जगभरातील रेस्टॉरंट्सबद्दल हे माहित आहे का ?
आशा भोसले यांच्या हाताला उत्तम चव होती. Image Credit source: social media
| Updated on: Apr 12, 2026 | 2:05 PM
Share

दीनानाथ मंगेशकर आणि शेवंती मंगेशकर यांची कन्या असलेल्या आशा भोसले (Asha Bhosle), लहानपणापासूनच आपल्या अटींवर आयुष्य जगल्या. आशा यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात एक अनोखा नाद, त्यांच्या आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध केलं. जगभरात पसरलेले कोट्यावधी चाहते हे त्यांच्या आवाजाने नुसते भारावून जात नाहीत, तर त्यांचा आवाज आपल्याला ट्रान्समध्ये नेतो. पण फक्त गायिका हीच त्यांची ओळख नाही. अत्यंत व्हर्सेटाईल सिंगर असलेल्या आशा भोसले यांच्या हातालाही तितकीच सुरेख चव होती. खाण्यावर, खाऊ घालण्यावर त्यांचं प्रचंड प्रेम, याच प्रेमातून त्यांनी जगभरात रेस्टॉरंट्सची चेन उघडली. हो, हे खरं आहे. आशा भोसले केवळ एक उत्कृष्ट गायिकाच नाहीत, तर त्यांच्यात एक अशी जादूई मोहिनी आहे जी खवय्ये कधीही विसरू शकत नाहीत. त्यांच्या निधनामुळे झालेली पोकळी कधीही भरून निघू शकतं नाही. मुंबतील रुग्णलयात त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी आज (12 एप्रिल) अखेरचा श्वास घेतला.

सांगलीत, 8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशा भोसले या फक्त पार्श्वगायिका नव्हे तर उद्योजिका आणि अभिनेत्रीसुद्धा होत्या. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्या एक उत्तम कूक, सुगरण, अन्नपूर्णाही होत्या. आज त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आपण, त्यांच्या गाण्यांबद्दल आणि खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत.

संगीतसृष्टीतील दिग्गज मंगेशकर घराण्यातील मुलगी, हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गायिका लता मंगेशकर यांची भगिनी एवढीच आशा भोसले यांची ओळख नाही. त्या स्वत:देखील अतिशय उत्तम आणि तितक्याच व्हर्सेटाईल सिंगर, आशा भोसलेंनी त्यांच्या आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. त्यांचे बालपण फार सुखी नव्हतं, गायिका म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करणं हेही आशा भोसलेंसाठी निश्चितच सोपं नव्हतं.  पण त्यांनी सर्व आव्हानं पेलत, कठीण काळाचा सामना करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. आपण सर्वांनी आशाताईंच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण त्यांच्या स्वयंपाकाच्या आवडीबद्दल क्वचितच बोललं जातं. चला, त्याबद्दल जाणून घेऊया.

गायिका नसत्या तर बनल्या असत्या उत्तम कूक

आशा भोसले यांचा मनमोहक आवाजाइतकचं त्यांचं जेवणंही लाजवाब.  रिपोर्ट्सनुसार, आशाताईंना स्वयंपाकाची खूप आवड होती; अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या हाताने बनवलेल्या बिर्याणीची,   तसेच अनेक पदार्थांची प्रशंसा केली. एका मुलाखतीत आशा भोसले यांनी स्वतः सांगितलं होतं की, जर त्या गायिका झाल्या नसत्या, तर त्या नक्कीच उत्तम कूक झाल्या असत्या. आशा भोसले यांनी आपल्या उत्तम आवाजासाठी आणि गायनासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार तसेच आणि पद्मविभूषण यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले असले तरी, त्यांनी स्वयंपाकाची आपली आवडही जपली.

रेस्टॉरंट चेनच्या आहेत मालक

खाण्याच्या याच आवडीतून त्यांनी अनेक रेस्टॉरंट्स उघडली,  त्या रेस्टॉरंट चेनच्या मालक बनल्या.  दुबई आणि कुवेतमध्ये ‘आशाज’ नावाचं त्यांचं रेस्टॉरंट आहे. अबू धाबी, दोहा आणि बहरीनमध्येही त्यांची रेस्टॉरंट्स असून या रेस्टॉरंट्समध्ये प्रामुख्याने भारतीय खाद्यपदार्थ मिळतात. एवढंच नव्हे तर आशा भोसले यांनी स्वतः या रेस्टॉरंटमधील शेफना प्रशिक्षण दिलं होतं.  आशा भोसलेंच्या रेस्टॉरंटची कहाणी इथेच संपत नाही. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ रसेल स्कॉट यांनी ब्रिटनमधील आशा ब्रँडचे हक्क विकत घेतले. आशा नावाने अंदाजे 40 रेस्टॉरंट उघडण्याची योजना होती. अशा या विख्यात, व्हर्सेटाईल गायिकेच्या आणि सुगरण महिलेच्या जाण्याने चाहते हेलावले आहेत.

आशा भोसले यांनी शेअर केलेला हा एक जुना व्हिडीओ, त्यांचं प्रेम यातून दिसून येतं.

View this post on Instagram

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle)

Follow Us
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय
ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई....
Mumbai | ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई पोलिसांची मोठी धावपळ!
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
BJP Meeting | राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत... काय घडतंय?
देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! शरद पवारांनाही टाकले मागे
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवारांनाही टाकले मागे
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिरवा कंदील मिळणर?
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी..
Ladki Bahin | लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी छाननी
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
Jejuri Vari Accident | भंडाऱ्याच्या उत्साहात काळाचा घाला! जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!