AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Bhosle : आशा भोसले काळाच्या पडद्याआड, कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार ?

महान गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. ७ दशके आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या आशाताईंच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर उद्या मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Asha Bhosle : आशा भोसले काळाच्या पडद्याआड, कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार ?
दैवी आवाज काळाच्या पडद्याआड,, आशा भोसले यांचं निधन
| Updated on: Apr 12, 2026 | 1:53 PM
Share

पिया तू अब तो आजा सारखं उडत्या चालीचं गाणं असो की जिवलगा राहीले रे हे गीत किंवा मागे उभा मंगेश हे गाणं असो…. कोणतंही गाणं लीलया पेलण्याची आणि तितक्याच ताकदीने निभावून नेण्याची खुबी असलेल्या, लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आपलासा वाटणारा आवाज म्हणजे…. आशा भोसले (Asha Bhosale). गेल्या 7 दशकांहून अथक काळ आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ही चिरतरूण गायिका.. वयाच्या 93 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने काल त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांनी आज (12 एप्रिल) अखेरचा श्वास घेतला. 8 सप्टेंबर 1933 रोजी महाराष्ट्रातील सांगलीत त्यांचा जन्म झाला. अखेर आज मुंबईतील रुग्णायलयात त्यांचं निधन झालं.

थोड्यावेळापूर्वी आशा भोसले यांचा मुलगा, आनंद भोसले यांनी आशाताईंच्या जाण्याची दु:खद बातमी सर्वांसमोर सांगितली. यावेळी त्यांच्यासोबत आशिष शेलारही उपस्थित होते. मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे आशा भोसले यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, त्यांना मेडिकल प्रॉब्लेम होता असंही डॉक्टरांनी नमूद केलं.

कुठे होणार अंत्यसंस्कार?

यावेळी आशिष शेलार यांनी पुढील माहिती दिली. ” आशाताई आपल्यात राहिल्या नाही. कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे आज सर्व मेडिकल प्रक्रिया, फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील. लोअर परळला त्यांचं निवासस्थान आहे. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 पर्यंत त्यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाईल. नंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल आहे”, असं ते म्हणाले. आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील असंही त्यांनी नमूद केलं.

“आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुखात बुडाला. एका युगाचा अंत झाला. आशाताई आपल्यातून निघून गेल्या. त्या असणं समाधानाची अनुभूती देत होतं. त्यांचं आयुष्य आणि प्रवास दुखाला कवटाळून दुसऱ्याला सुख देण्याचा मार्ग होतं. त्यांचं कर्तृत्व जगाला वेड लावणारं होतं. संगीत क्षेत्रातील कर्तृत्व जगाला देणं आहे” अशा शब्दांत आशिष शेलार यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?