Ramya Krishnan: जबरदस्ती असो, स्वतःच्या मर्जीने.. इंडस्ट्रीत महिलांचं होणारं शोषण, ‘बाहुबली’ फेम शिवगामी देवी स्पष्टच म्हणाली

Ramya Krishnan: 'जबरदस्ती असो, स्वतःच्या मर्जीने..', 'बाहुबली' फेम अभिनेत्री राम्या कृष्णन हिने इंडस्ट्रीचं काळ सत्य समोर आणलं आहे. महिलांचं होणारं शोषण आणि कास्टिंग काउचबद्दल अभिनेत्रीने मोठा खुलासा केलाय...

Ramya Krishnan: जबरदस्ती असो, स्वतःच्या मर्जीने.. इंडस्ट्रीत महिलांचं होणारं शोषण, बाहुबली फेम शिवगामी देवी स्पष्टच म्हणाली
Ramya Krishnan
| Updated on: Nov 17, 2026 | 1:34 PM

साऊथ सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री राम्या कृष्णन कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीची चर्चा सर्वत्र रंगली आहे. कारण राम्या हिने इंडस्ट्रीची काळी बाजू सर्वांसमोर आणली आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत राम्याने हिने सिनेविश्वातील कास्टिंग काऊच आणि कलाकारांचं होत असलेलं शोषण याबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. राम्या स्पष्ट म्हणते की, ‘इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊच आणि कलाकारांची वाईट फायदे घेतला जातो… अशा घटना घडत असतात. याला कोणी नकार देत नाही…’ पण अभिनेत्रीने असं देखील स्पष्ट केलं की, यामध्ये कोणता लिंगभेद नसतो… कोणतीच मर्यादा नसते…’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राम्या हिला विचारण्यात आलं की, सिनेविश्वात खरंच कास्टिंग काउच होतं का? यावर अभिनेत्री स्पष्टच म्हणाली की, ‘एपस्टिन फाईल्सकडे पाहा… ही घटना अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रात झाली आहे. जेथे महिला सर्वांत पुढे आहे… असं असताना तेथील महिलांना देखील वाईट गोष्टींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तु्म्ही असं म्हणू शकत नाही की, येथे अशा घटना होत नसतील… पूर्वी देखील झालंय आणि पुढे देखील होणार आहे…’

Loading...

‘पण ती घटना तुमच्यासोबत कशी घडली? तुमच्या हो किंवा नाही बोलण्याचा पर्याय होता का? वेळेनुसार गोष्टी पूर्णपणे बदललेल्या आहेत. “हीच याची वस्तुस्थिती आहे. मग ती जबरदस्ती असो, स्वतःच्या मर्जीने असो किंवा मग सामान्य पद्धतीने असो, हे असंच चालत राहणार आणि सुरूच आहे. याला कोणीही नाकारू शकत नाही. आपला व्यवसाय ग्लॅमरशी जोडलेला आहे, म्हणूनच लोक याबद्दल बोलतात; पण बाहेर कितीतरी महिला अशा गोष्टींचा सामना करत असतात? हे सर्वत्र घडतं आणि यात जेंडरचा काहीही फरक पडत नाही.’ असं देखील अभिनेत्री स्पष्ट म्हणाली आहे.

सांगायचं झालं तर, 2002 मध्ये ‘खडगम’ सिनेमा प्रदर्शित झालेला. सिनेमाचं दिग्दर्शन राम्या हिचे पती आणि दिग्दर्शक कृष्णा वंशी यांनी केलं होतं. सिनेमात चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं होतं. या सिनेमात संगीताने ‘सीतामहालक्ष्मी’ नावाच्या एका तरुणीची भूमिका साकारली होती, जिची अभिनेत्री बनण्याची इच्छा असते, परंतु तिला असं वाटतं की शोषणाला बळी पडण्याशिवाय तिच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नाही.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us