Bharat Jadhav On Nana Patekar: त्यांना कुठूनतरी कळलं की मी.. भरत जाधवने नाना पाटेकरांबद्दल सांगितला थेट हृदयाला भिडणारा प्रसंग

Bharat Jadhav On Nana Patekar: अभिनेते भरत जाधव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत.

Bharat Jadhav On Nana Patekar: त्यांना कुठूनतरी कळलं की मी.. भरत जाधवने नाना पाटेकरांबद्दल सांगितला थेट हृदयाला भिडणारा प्रसंग
Nana Patekar and bharat Jadhav
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 10:35 AM

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले. गोव्यातील घरात वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. दरम्यान, मराठी अभिनेते भरत जाधव यांनी देखील एक किस्सा सांगितला आहे. आयुष्याच्या थोड्या कठीण काळात त्यांना नाना पाटेकर यांचा फोन आला होता. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया…

भरत जाधव यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले की, नाना पाटेकर माझं एकदम व्यवस्थित चालू होतं. त्यांना कुठून तरी कळालं आणि त्याचा मला फोन आला. अरे भरत कसा आहेस तू? नाही मी मस्त आहे.. नाही अरे तू टेन्शनमध्ये आहेस असं कळालं? मी म्हटलं नाही. नाबी नाही मला कळलंय.. हे बघ काही टेन्शन घेऊ नकोस आणि काहीही लागलं आर्थिकपण मला सांग. पण तू टेन्शन घेऊन काम करु नकोस. असं ते बोलले मला.

Loading...

वाचा: या सीनवरून सुरु झाला नाना पाटेकर आणि तनुश्रीमध्ये वाद, अखेर व्हिडीओ समोर आला

पुढे ते म्हणाले की, अरे बापरे म्हणजे… मी नव्हतोच तेव्हा टेन्शनमध्ये… मला माहिती आहे 19 20 गोष्टी असतात. पण मला ना खूप बरं वाटलं की त्या व्यक्तीने मला विचारले. मैत्री म्हणतो ना आपण ती मैत्री अशी असते. ह्या लोकांनाही कुठे ना कुठे आपल्याला नॉक केल्यामुळे काय होतं की कोणीतरी आपल्याकडे बघतोय. आपल्याला तो अजून प्रोत्साहन देतोय. नकळत प्रोत्साहन मिळतं ना. आणि ह्या ज्या गोष्टी येतात ना त्यामुळे अजून सकारात्मक होतो. अजून काही तरी कायची इच्छा होते.

नाना पाटेकर यांच्या निधनाविषयी

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी 8 ऑक्टोबर रोजी पहाटे बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नाना पाटेकर ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांना पहाटे ५:२० वाजता मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक तपासानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे प्रयत्न केले, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us