Nana Patekar: या सीनवरून सुरु झाला नाना पाटेकर आणि तनुश्रीमध्ये वाद, अखेर व्हिडीओ समोर आला
Nana Patekar: नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी 2008 साली कोणत्या सीनवरुन तनुश्री दत्तासोबत वाद सुरु झाला होता? हे सांगितले आहे. पाहा...

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या 75व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याने नाना पाटेकर यांनी गोव्यातील घरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. मात्र, अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना यांच्या निधनानंतरही त्यांच्यावर अनेक आरोप केले. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर आणि तनुश्री यांच्यामध्ये नेमका वाद कोणत्या सीनच्या वेळी झाला हे समोर आले आहे.
काय आहे व्हायरल व्हिडीओ?
सोशल मीडियावर एका इन्स्टाग्राम पेजने नाना पाटेकर यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर आणि तनुश्री दत्तामध्ये 2008 साली ज्या सीनवरुन वाद झाला होता तो सीन दाखवण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एका आयटम साँगचे चित्रीकरण सुरु असल्याचे दिसत आहे. तनुश्री दत्ता सेटवर डान्सची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. तर तिच्या पाठीमागे नाना पाटेकर उभे असल्याचे दिसत आहे. तसेच सेटवर अनेकजण उपस्थित असल्याचे देखील दिसत आहे.
View this post on Instagram
नाना पाटेकर काय म्हणाले?
तसेच या व्हायरल व्हिडीओमध्ये नाना पाटेकर हे घडलेला प्रकारही सांगताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नाना म्हणाले होते की, मला ते पण माहिती नाही. ती तिकडे थांबली नाही म्हणून तिला रिपलेस करण्यात आले. माझे तर काम होते. स्टेजवर तिच्यासोबत कशाप्रकारे गैरवर्तन केले? तिकडे हजारो लोकांसमोर हा सीन शूट होत होता. मला एक गोष्टीचा किसळ येत आहे की मला अशा प्रकारे स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.
पुढे ते म्हणाले की, गेल्या 35 वर्षे मी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. कधी कोणी माझ्यावर असा घाणेरडा आरोप केला नाही. ही मुलगी असे का बोलत आहे? मला कळत नाही. त्या मुलीला कळायला हवे की ती काय बोलत आहे? मला तर कारण पण माहिती नाही. तिला रिपलेस का करण्यात आले? हेही मला माहिती नाही. ती तिथे स्टेजवर थांबली नाही.
