AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमानंद महाराजांच्या शिष्यासोबत लग्न करणारी अभिनेत्री प्रेग्नेंट, बॉयफ्रेंडसोबत नको ते व्हिडीओ समोर येताच स्वीकारला अध्यात्म

झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे प्रेमानंद महाराजांचे भक्त आहे. अशात एका अभिनेत्रीबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. बॉयफ्रेंडसोबत नको ते व्हिडीओसमोर आल्यानंतर अभिनेत्रीने प्रेमानंद महाराजांच्या शिष्यासोबत लग्न केलं आणि आता ती प्रेग्नेंट आहे.

प्रेमानंद महाराजांच्या शिष्यासोबत लग्न करणारी अभिनेत्री प्रेग्नेंट, बॉयफ्रेंडसोबत नको ते व्हिडीओ समोर येताच स्वीकारला अध्यात्म
Priyanka Pandit
| Updated on: Oct 05, 2026 | 11:54 AM
Share

वृंदावर स्थित प्रेमानंद महाराज यांच्या भक्तांची संख्या फार मोठी आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील त्यांची ख्याती पसरलेली आहे. दरम्यान, प्रेमानंद महाराज यांचं आश्रम सध्या वादाच्या भोवऱ्यात असताना, एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. ग्लॅमर विश्वाचा निरोप घेत एका लोकप्रिय अभिनेत्रीने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि प्रेमानंद महाराज यांची शिष्या झाली. त्यानंतर अभिनेत्री प्रेमानंद महाराज यांच्या शिष्यासोबतच लग्न केलं. आता अभिनेत्री आई होणार आहे. ही गुडन्यूज खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून भोजपूरी अभिनेत्री प्रियंका पंडित आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे. प्रियंका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, एका काळी खसारी लाल यादवसह अनेक मोठ्या सुपरस्टार्ससोबत काम करणारी अभिनेत्री प्रियंका पंडित हिने काही काळापूर्वी शोबिज सोडून कृष्णभक्तीचा मार्ग पत्करला होता.

प्रियंका हिने अगदी गुप्तपणे प्रेमानंद महाराजांच्या हरि सेवकासोबत लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात केली. आता कृष्णभक्तीत तल्लीन असतानाच तिला आई होण्याचं सौभाग्य लाभलं आहे. सोशल मीडियावरर एक सुंदर फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, ‘आमच्या घरी एक लहानशी खूशहाली येणार आहे.’ असं लिहिलं आहे.

बॉयफ्रेंडसोबत नको ते व्हिडीओ

एक काळ असा होता, जेव्हा प्रियंका झगमगत्या विश्वात करियरच्या उच्च शिखरावर होती, तिने जवळपास 50 सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण खासगी आयुष्यातील एका चुकीमुळे सर्व होत्याचं नव्हतं झालं. अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत नको ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला सिनेमाच्या ऑफर येणं देखील कमी झालं. तिच्याबद्दल अनेक चर्चा देखील रंगल्या.

अशात, निर्माण झालेल्या परिस्थितीला कंटाळल्यानंतर प्रियंका हिने सिनेविश्वाला राम राम ठोकला आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. ती प्रेमानंद महाराज यांची शिष्य बनली असून त्यांच्याच शिष्यासोबत तिने लग्न केलं. पण तिचा नवरा कोण आहे. याबद्दल माहिती समोर आलेली नाही. प्रियंकाने सोशल मीडियावर नवऱ्यासोबत फोटो पोस्ट केले आहेत. पण चेहरा लपवला आहे.

Follow Us
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?