तैमुर, दीपिका, कतरिनाला विसरा! आता बाजारात आलीय बिग बॉसच्या ‘या’ अभिनेत्रीची बाहुली!

बॉलिवूड स्टार आणि टीव्ही स्टार्सची लोकप्रियता पाहून त्यांच्या बाहुल्या बाजारात विक्रीस येतात. यापूर्वी कतरिना कैफ, सारा अली खान, तैमूर अली खान ते अगदी हिना खान या कलाकारांच्या बाहुल्यांच्या बाजारात आल्या होत्या.

तैमुर, दीपिका, कतरिनाला विसरा! आता बाजारात आलीय बिग बॉसच्या ‘या’ अभिनेत्रीची बाहुली!
निक्की तंबोली

मुंबई : बॉलिवूड स्टार आणि टीव्ही स्टार्सची लोकप्रियता पाहून त्यांच्या बाहुल्या बाजारात विक्रीस येतात. यापूर्वी कतरिना कैफ, सारा अली खान, तैमूर अली खान ते अगदी हिना खान या कलाकारांच्या बाहुल्यांच्या बाजारात आल्या होत्या. या यादीत आता आणखी एक नाव सामील झाले आहे. आता ‘बिग बॉस 14’ची सर्वात चर्चित स्पर्धक निक्की तंबोलीचीही (Nikki Tamboil) बाहुलीच्या बाजारात आली आहे. निक्कीप्रमाणेच लाल कपडे परिधान केलेली निक्कीची बाहुली बाजारात आली आहे. बिग बॉसमध्ये तिच्या ड्रेसिंग सेन्सला चांगली पसंती मिळाली होती (Bigg Boss 14 Fame Nikki Tamboli Toy Doll in market).

अलीकडेच निक्की रुबीनाच्या घरी सेलिब्रेशनसाठी पोहोचली होती. अभिनव आणि रुबीनाबरोबर निक्कीने खूप धमाल केली. ‘बिग बॉस’च्या घरात निक्की आणि रुबीना एकमेकींच्या मानलेल्या बहिणी झाल्या होत्या.

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही निक्कीची लोकप्रियता लक्षणीय वाढली आहे. एवढेच नव्हे, तर बऱ्याच मोठ्या प्रोजेक्टच्या ऑफर आता तिच्याकडे चालून येत आहेत. सध्या, मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलासमवेत निक्की एक चित्रपट करणार असल्याचे वृत्त चर्चेत आहे. या व्यतिरिक्त तिला बर्‍याच चित्रपट आणि वेब शो कडून ऑफर आल्या आहेत. तसे, निक्कीने अद्याप यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

निक्कीची बाहुली

 

View this post on Instagram

 

A post shared by nikki_tamboli (@nikkitambolli_fc)

बिग बॉसच्या घरात वाढले वजन!

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत निक्की तंबोलीने सांगितले होते की, ती बिग बॉसच्या घरात दररोज 12-15 पराठे खात होती. निक्की म्हणाली होती, ‘मी डाएट खूप कॉन्सीश आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून पराठे-रोटी खाल्ली नव्हती. ‘बिग बॉस’च्या घरात मी माझा डाएट पाळला नाही. त्यामुळे माझे वजन वाढले आहे. आता बाहेर आल्यानंतर मी फक्त कॉफी पित आहे आणि निरोगी डाएट घेण्यास सुरुवात केली आहे. मी माझ्या आहारात फिश सूप, कोशिंबीर आणि किनोवा सामील करते. भाकरी आणि तांदूळ देखील माझ्या आहाराचा भाग नाहीत.’(Bigg Boss 14 Fame Nikki Tamboli Toy Doll in market)

वजन कमी करण्यासाठी करणार अथक प्रयत्न!

निक्कीने सांगितले की, जास्त खाल्ल्यामुळे तिचे वजनही वाढले आहे. जास्त खाण्याच्या कारणामुळे त्यांचे वजन वाढले, जे आता कमी करण्याचा प्रयत्न करण्यास निक्कीने सुरुवात केली आहे. निक्कीने सांगितले की, पूर्वी तिची कंबर ‘24’ असायची, पण बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर ती ‘27’ झाली आहे. तिचे वजन देखील खूप वाढले आहे, जे आता ती कमी करण्यासाठी आणि आधीप्रमाणे तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न ती करत आहे.

स्वत:च बनवत होती स्वतःचे जेवण!

दिवसातून 12-15 पराठे खाल्ल्यानंतर निक्कीला विचारले गेले की, तिच्यासाठी जेवण कोण बनवायचे? यावर निक्की म्हणाली, ‘मला स्वतःला स्वयंपाक करायला आवडत असे. सुरुवातीला प्रत्येकजण खूप अन्न खायचे. खाण्याची कधीच अडचण नव्हती, परंतु नंतर जेवणावरून बरीच नाटकं झाली. हे सर्व विकास गुप्ता यांच्यामुळे झाले, असे ती म्हणाली.

(Bigg Boss 14 Fame Nikki Tamboli Toy Doll in market)

हेही वाचा :

Income Tax Raid | ‘हे तर छोटे प्लेयर…’, इन्कमटॅक्स धाडीनंतर कंगनाचा अनुराग-तापसीवर हल्लाबोल!

CHYD | लाडक्या ‘विनोदवीर’ मित्रासाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, पाहा काय म्हणाला कुशल…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI