CHYD | लाडक्या ‘विनोदवीर’ मित्रासाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, पाहा काय म्हणाला कुशल…

‘चला हवा येऊ द्या’च्या प्रत्येच भागाची रसिकांना आतुरता असते. नुकतच या कार्यक्रमातील सर्व रसिक प्रेक्षकांचा लाडका ‘भाऊ’ अर्थात भालचंद्र कदम यांचा वाढदिवस साजरा झाला.

CHYD | लाडक्या ‘विनोदवीर’ मित्रासाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, पाहा काय म्हणाला कुशल...
भाऊ कदम आणि कुशल बद्रिके

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ हा संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा कार्यक्रम रसिकांसाठी नेहमीच खुमासदार मनोरंजनाची मेजवानी घेऊन येतो. ‘चला हवा येऊ  द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. ही कथाबाह्य मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. भाऊ कदम असो वा सागर कारंडे, श्रेया बुगडे असो किंवा नव्याने आलेली स्नेहल शिदम कार्यक्रमातले सर्वच विनोदवीर एकापेक्षा एक आहेत, ‘चला हवा येऊ द्या‘च्या सेटवर नेहमी मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांची लगबग असते(Chala Hawa Yeu Dya Fame Kushal Badrike whishes happy birthday to co-star Bhau Kadam).

बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनाही डॉ. निलेश साबळेंनी (Dr. Nilesh Sable) वसवलेल्या थुकरटवाडीत हजेरी लावल्याशिवाय चैन पडत नाहीत. ऐवढेच नाहीतर ‘चला हवा येऊ द्या’मध्ये चक्क राजकीय नेत्यांनी देखील हजेरी लावलेली दिसली.

भाऊचा ‘बड्डे’!

आजवर अनेक एपिसोडमधून गेली सहा वर्ष सातत्याने ते प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतायत. ‘चला हवा येऊ द्या’च्या प्रत्येच भागाची रसिकांना आतुरता असते. नुकतच या कार्यक्रमातील सर्व रसिक प्रेक्षकांचा लाडका ‘भाऊ’ अर्थात भालचंद्र कदम यांचा वाढदिवस साजरा झाला.

कुशल बद्रिके आणि भाऊ कदमची जोडी नेहमीच सर्वांना खळखळून हसवते. कधी सीआयडीमधले इन्स्पेक्टर बनून, बनून तर कधी सासू-सूना बनून या जोडीने धम्माल उडवून दिली आहे. या लाडक्या जोडीतील कुशलने भाऊच्या वाढदिवसानिमित्त फोटो एक छानशी पोस्ट करत लाडक्या दोस्ताला खास शुभेच्छा दिल्या आहेत. कुशलने शेअर केलेल्या या खास पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत (Chala Hawa Yeu Dya Fame Kushal Badrike whishes happy birthday to co-star Bhau Kadam).

‘सलामत रहे दोस्ताना हमारा’ कुशलची खास पोस्ट!

(Chala Hawa Yeu Dya Fame Kushal Badrike whishes happy birthday to co-star Bhau Kadam)

कथाबाह्य कार्यक्रमात ‘हवा येऊ दे’चा गाजावाजा…

या कार्यक्रमात डॉ. निलेश साबळेसह भालचंद्र कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे आणि श्रेया बुगडे हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत झळकतात. 2020च्या दिवाळीपासून स्वप्निल जोशीने या कार्यक्रमात परीक्षक म्हणून उपस्थित राहण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमात मराठी रंगभूमी, मराठी मालिका आणि मराठी चित्रपट यातील कलाकार हजेरी लावतात आणि त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करतात, त्या संबंधित माहिती प्रेक्षकांना देतात. केवळ मराठी कलाकाराच नव्हे तर, ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर राजकिय नेत्यांनी देखील हजेरी लावली होती. बऱ्याच वेळा चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हिंदी चित्रपटातील कलाकारांना देखील बोलावले जाते. अत्यंत कमी कालावधीत या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.

(Chala Hawa Yeu Dya Fame Kushal Badrike whishes happy birthday to co-star Bhau Kadam)

हेही वाचा :

Yeu Kashi Tashi mi Nandayla | मालिकांच्या विश्वात नेमकं चाललंय तरी का?, ‘येऊ कशी तशी..’च्या ‘त्या’ दृश्यावर प्रेक्षक संतापले!

Video | ‘पाहिले न मी तुला’ शीर्षकगीताला नेटकऱ्यांची पसंती, पाहा कसे तयार झाले ‘हे’ गाणे!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI