Nilesh Sable | ‘कॅप्टन ऑफ द शिप’ डॉ.निलेश साबळेंची इन्स्टाग्रामवर एंट्री, सोशल मीडियावर दिसणार ‘चला हवा येऊ द्या’ची हवा!

लेखक-दिग्दर्शक निलेश साबळेची इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर नुकतीच दणक्यात एंट्री झाली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:42 PM, 6 Jan 2021
Nilesh Sable | ‘कॅप्टन ऑफ द शिप’ डॉ.निलेश साबळेंची इन्स्टाग्रामवर एंट्री, सोशल मीडियावर दिसणार ‘चला हवा येऊ द्या’ची हवा!

मुंबई : ‘काय मंडळी हसताय ना…हसायलाच पाहिजे’, असे म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला खळखलून हसायला लावणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा यशस्वीरित्या सांभाळणारा कॅप्टन म्हणजेच लेखक-दिग्दर्शक निलेश साबळेची इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर नुकतीच दणक्यात एंट्री झाली आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या संपूर्ण टीमने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे (Chala Hava Yeu Dya Fame Dr Nilesh Sable on Instagram).

‘कॉमेडी क्वीन’ श्रेया बुगडेने निलेश साबळेंच्या अकाऊंटवरुनच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात निलेश साबळे यांनी चाहत्यांना आता काळाची गरज आणि चाहत्यांपर्यंत पोहचण्यासाठी आपण इन्स्टाग्रामवर येत असल्याचे म्हटले आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या संपूर्ण टीमने डॉ. निलेश साबळेंच्या ऑफीशियल अकाऊंटला फॉलो करण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे.

डॉक्टर ते अॅक्टर प्रवास…

वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या डॉक्टर निलेश साबळेंनी ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. इथूनच त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. शाळा-महाविद्यालयात असताना निलेश यांनी अनेक नाटकांत भाग घेतला होता. अभिनयाच्या ओढीने त्यांनी मनोरंजन क्षेत्रात येण्याचे ठरवले. ‘फु बाई फु’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. सूत्रसंचालकाचा प्रवास पुढे लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यापर्यंत पोहोचला (Chala Hava Yeu Dya Fame Dr Nilesh Sable on Instagram).

कथाबाह्य कार्यक्रमात ‘हवा येऊ दे’चा गाजावाजा…

‘चला हवा येऊ द्या’(Chala Hawa Yeu Dya) ही कथाबाह्य मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. भाऊ कदम असो वा सागर कारंडे, श्रेया बुगडे असो किंवा नव्याने आलेली स्नेहल शिदम कार्यक्रमातले सर्वच विनोदवीर एकापेक्षा एक आहेत. ‘चला हवा येऊ द्या‘च्या सेटवर नेहमी मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांची लगबग असते. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनाही डॉ. निलेश साबळेंनी (Dr Nilesh Sable) वसवलेल्या थुकरटवाडीत हजेरी लावल्याशिवाय चैन पडत नाहीत.

या कार्यक्रमात डॉ. निलेश साबळेसह भालचंद्र कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे आणि श्रेया बुगडे हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत झळकतात. 2020 च्या दिवाळीपासून स्वप्निल जोशीने या कार्यक्रमात परीक्षक म्हणून उपस्थित राहण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमात मराठी रंगभूमी, मराठी मालिका आणि मराठी चित्रपट यातील कलाकार हजेरी लावतात आणि त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करतात, त्या संबंधित माहिती प्रेक्षकांना देतात. केवळ मराठी कलाकाराच नव्हे तर, ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर राजकिय नेत्यांनी देखील हजेरी लावली होती. बऱ्याच वेळा चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हिंदी चित्रपटातील कलाकारांना देखील बोलावले जाते. अत्यंत कमी कालावधीत या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.

(Chala Hava Yeu Dya Fame Dr Nilesh Sable on Instagram)