AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 : ‘मी पूर्वी अनेकांना डेट केलंय, यापुढे देखील…’, निमृत कौर तिच्या खासगी आयुष्याबद्दल स्पष्टच म्हणाली

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच निमृत कौर हिच्या बॉयफ्रेंडच्या लिस्टबद्दल मोठी माहिती समोर ; अनेक बॉयफ्रेंड होते असं म्हणारी निमृत कौर कधी करणार लग्न?

Bigg Boss 16 : 'मी पूर्वी अनेकांना डेट केलंय, यापुढे देखील...', निमृत कौर तिच्या खासगी आयुष्याबद्दल स्पष्टच म्हणाली
Bigg Boss 16 : 'मी पूर्वी अनेकांना डेट केलंय, यापुढे देखील...', निमृत कौर तिच्या खासगी आयुष्याबद्दल स्पष्टच म्हणाली
| Updated on: Feb 07, 2023 | 9:35 AM
Share

Bigg Boss 16 : बिग बॉस कायम चाहत्यांमध्ये चर्चेत राहणारा विषय आहे. बिग बॉस १६ शोची पहिली कॅप्टन निमृत कौर आता घरातून बाहेर पडली आहे. बिग बॉसच्या घरात आलेल्या प्रेक्षकांनी सर्वांत कमी मतं देऊन निमृत कौर आहलुवालियाला शोमधून काढून टाकलं आहे. ज्यामुळे निमृत तुफान चर्चेत आली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्रीने Tv9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. निमृत हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल आणि बिग बॉसच्या घरात होणाऱ्या गोष्टींबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं. सध्या सर्वत्र निमृत आणि तिने केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

निमृत कौर हिने यावेळी तिच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला. निमृतला विचारण्यात आलं, ‘तू तुझ्या को-स्टारला डेट करते का?’ यावर प्रश्नाचं उत्तर देण्याआधी निमृतने त्या को-स्टारचं नाव विचारलं. तेव्हा निमृतला मिहिर पांधीबद्दल विचारण्यात आलं. यावर निमृत म्हणाली, ‘मी बिग बॉसच्या आधी अनेकांना डेट केलं आहे आणि पुढे देखील करले. आता देखील मी एका व्यक्तीली डेट करत आहे. पण जोपर्यंत मी लग्नाचा विचार करत नाही तोपर्यंत यावर काहीही बोलणार नाही…’ असं निमृत म्हणाली

निमृत कौर आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर विजयी कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर शिव किंवा एमसी स्टॅन यांना बीग बॉसची ट्रॉफी मिळावी अशी निमृत कौर हिची इच्छा आहे. पुढे निमृत म्हणाली, ‘मी कोणालाही मिस करणार नाही कारण पुढच्या सात दिवसांत सर्वांना भेटणार आहे. मी फक्त माझ्या कुटुंबाला मिस करत आहे.’ शिवाय यावेळी निमृत हिने कुटुंबियांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (nimrit kaur ahluwalia reaction on her relationship)

मुलाखतीत निमृत पुढे म्हणाली, ‘बिग बॉसच्या घरात अन्य स्पर्धक तुमची नकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट मला फार दिवसांनंतर कळाली. मला आश्चर्य वाटायचं की हे लोक कॅमेऱ्यासमोर तीच गोष्ट पुन्हा पुन्हा का सांगत आहेत, पण ते एक चुकीची गोष्ट आणि ट्रॅक तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं नंतर लक्षात आलं.’ असं देखील निमृत म्हणाली.

बॉसच्या घरात आलेल्या प्रेक्षकांनी सर्वांत कमी मतं देऊन निमृत कौर आहलुवालियाला शोमधून काढून टाकलं. आता घरात शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टॅन, अर्चना गौतम आणि शालीन भनोट हे पाच स्पर्धक राहणार आहेत. त्यामुळे आता Bigg Boss 16 शोचा विजेता कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना