AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’मध्ये मोठा ट्विस्ट; घटस्फोटामुळे चर्चेत आलेली स्पर्धक तिसऱ्याच आठवड्यात घराबाहेर

Bigg Boss 20: तिसऱ्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून एक स्पर्धक बाहेर पडली आहे. घटस्फोटामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे ही स्पर्धक चर्चेत होती. आता तिच्या एलिमिनेशननंतर घरात 14 स्पर्धक राहिले आहेत.

Bigg Boss 20: 'बिग बॉस 20'मध्ये मोठा ट्विस्ट; घटस्फोटामुळे चर्चेत आलेली स्पर्धक तिसऱ्याच आठवड्यात घराबाहेर
तिसऱ्याच आठवड्यात झाली बादImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 28, 2026 | 8:34 AM
Share

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’च्या घरात सध्या एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडी घडताना दिसत आहेत. ‘वीकेंड का वार’मध्ये पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीचा शोमधील प्रवास संपला आहे. रॅपर बादशाहची पूर्व पत्नी म्हणून शोमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच ईशाची जोरदार चर्चा झाली होती. मात्र, प्रेक्षकांकडून अपेक्षित मतांचा पाठिंबा न मिळाल्याने तिला तिसऱ्याच आठवड्यात ‘बिग बॉस’चा निरोप घ्यावा लागला. या आठवड्यात ईशा रिखी आणि रॅपर यंग डीएसए हे एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले होते. दोघांपैकी कोणाचा प्रवास थांबणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. अखेर वोटिंगच्या निकालानंतर ईशाला घराबाहेर जावं लागलं. यंग डीएसएला ईशाच्या तुलनेत अधिक मतं मिळाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ईशाचा ‘बिग बॉस’मधील प्रवास अवघ्या तीन आठवड्यांत संपला.

सलमान खानने केली एलिमिनेशनची घोषणा

रविवारच्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान खानने ईशाच्या एलिमिनेशनची घोषणा केली. या सिझनमधून बाहेर पडणारी ती दुसरी स्पर्धक ठरली आहे. ईशाने घरात स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रेक्षकांच्या मतदानात तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ईशाच्या तीन आठवड्यांच्या प्रवासाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाला. काहींना तिचा गेम आवडला, तर काही प्रेक्षकांच्या मते ती स्पर्धेत आपली ठोस ओळख निर्माण करू शकली नाही.

View this post on Instagram

A post shared by Isha Rikhi (@isharikhi)

बादशाहसोबतच्या नात्यामुळे होती चर्चेत

ईशा रिखी ‘बिग बॉस 20’मध्ये सहभागी होण्याआधीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. रॅपर बादशाहसोबतच्या तिच्या नात्यामुळे तिचं नाव सातत्याने चर्चेत आलं होतं. त्यामुळे शोमध्ये प्रवेश केल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, घरातील तिचा प्रवास फार काळ टिकला नाही. ईशा रिखीच्या एलिमिनेशननंतर ‘बिग बॉस 20’च्या घरात आता 14 स्पर्धक उरले आहेत. याआधी रोहिद खान शोमधून बाहेर पडला होता. त्यामुळे स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे, तसतसं घरातील सदस्यांवर दबाव वाढताना दिसत आहे.

आगामी काळात शोमध्ये वाइल्डकार्ड एण्ट्री होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. नव्या स्पर्धकांच्या आगमनामुळे घरातील सध्याची समीकरणं, ग्रुप्स आणि नाती बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईशाच्या एलिमिनेशननंतर ‘बिग बॉस 20’मध्ये पुढे कोणते नवे ट्विस्ट पाहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?