AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 20: कनिका मान-यंग डीएसए, माही विज-आम्रपाली दुबे यांच्यात जोरदार भांडण; बिग बॉसने सर्वांनाच दिली शिक्षा

Bigg Boss 20: 'बिग बॉस'च्या घरात पहिल्याच आठवड्यात मोठा ड्रामा आणि बरीच भांडणं पहायला मिळाली. आता पहिल्या वीकेंड का वारमध्ये सलमान खान कोणाकोणाची शाळा घेतो आणि कोणाचं कौतुक करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Bigg Boss 20: कनिका मान-यंग डीएसए, माही विज-आम्रपाली दुबे यांच्यात जोरदार भांडण; बिग बॉसने सर्वांनाच दिली शिक्षा
Bigg Boss 20 updatesImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 12, 2026 | 12:05 PM
Share

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’चा सहावा एपिसोड चांगलाच गाजला. शो सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच घरातील स्पर्धकांमध्ये वाद, भांडणं आणि आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. सहाव्या एपिसोडमध्ये कनिका मान आणि यंग डीएसए यांच्यात जोरदार वाद झाला. त्याचबरोबर माही विज आणि आम्रपाली दुबे यांच्यातही किचनच्या कामावरून खडाजंगी झाली. या सगळ्या गोंधळानंतर बिग बॉसने अखेर संपूर्ण घरालाच शिक्षा सुनावली. एपिसोडमधील सर्वात मोठा वाद कनिका मान आणि घराचा पहिला कॅप्टन बनलेला यंग डीएसए यांच्यात पाहायला मिळाला. वॉशरूमच्या व्यवस्थेवरून दोघांमध्ये चर्चा सुरू झाली आणि काही वेळातच त्याचं रूपांतर जोरदार भांडणात झालं.

बिग बॉसच्या घरात वॉशरूममध्ये केस आढळल्याने यंग डीएसएनं नाराजी व्यक्त झाली. त्याने या प्रकारावर आक्षेप घेतला. त्यावर कनिकानेही त्याला चांगलंच सुनावलं. “तू माझा कॅप्टन नाही, इथला बादशाह बनलेला नाहीस,” अशा शब्दांत कनिकाने तिची नाराजी व्यक्त केली. दोघांमधील वाद  वाढल्यानंतर घरातील इतर सदस्यांनाही हस्तक्षेप करावा लागला.याच एपिसोडमध्ये माही विज आणि भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे यांच्यातही किचनच्या कामावरून वाद झाला. घरातील कामांची विभागणी आणि स्वयंपाकाच्या मुद्द्यावरून दोघींमध्ये मतभेद झाले. या वादानंतर आम्रपालीने उदिती सिंहची माफी मागितल्याचंही समोर आलं.

याशिवाय अमन गांधी आणि आसिफ खान यांच्यातही जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. त्यामुळे एका दिवसात बिग बॉसच्या घरातील वातावरण अनेकदा तापलेलं दिसलं. दरम्यान, यंग डीएसएने दिवसा झोपण्याचा नियम मोडल्याने बिग बॉसने त्याला सुनावलं. मात्र, या चुकीची शिक्षा केवळ यंगलाच न देता संपूर्ण घराला देण्यात आली. बिग बॉसने घरातील राशनमध्ये तब्बल 30 टक्के कपात केली. त्यामुळे स्पर्धकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं.

‘बिग बॉस 20’ला 6 सप्टेंबर 2026 रोजी सुरुवात झाली असून पहिल्याच आठवड्यात घरातील स्पर्धकांमध्ये जोरदार मतभेद पाहायला मिळत आहेत. आता आगामी ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान या वादांवर स्पर्धकांची कशी शाळा घेतो, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...