AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahhi Vij : घटस्फोटानंतर माही विजच्या आयुष्यात पुन्हा प्रेम फुलणार? काझी तौकीरच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिली मोठी हिंट!

टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री माही विज सध्या 'बिग बॉस 20' मध्ये स्पर्धक म्हणून दिसत्ये. शोमधला तिचा गेम लोकांना आवडतोय. याचदरम्यान माहीने तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा केला आहे. काय म्हणाली माही ?

Mahhi Vij : घटस्फोटानंतर माही विजच्या आयुष्यात पुन्हा प्रेम फुलणार? काझी तौकीरच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिली मोठी हिंट!
| Updated on: Oct 21, 2026 | 4:21 PM
Share

बिग बॉस शो मध्ये सध्या स्पर्धकांमध्ये विविध विषयांवर गप्पा आणि मजा, मस्ती, हसणं सुरू असतं. शोमध्ये स्पर्धक एकमेकांना खासगी आयुष्याबद्दलही प्रश्न विचारत असतात. नुकताच काझी याने अभिनेत्री माही विज हिला तिच्या पर्सनल आयुष्याशी, लव्ह लाइफबद्दल काही प्रश्न विचारले. मात्र माहीने त्यावर अशा मजेशीर अंदाजात उत्तर दिल की ते पाहून प्रेक्षक बुचकळ्यात पडलेत. नमाही नव्या प्रेमाच्या शोधात आहे की काय, असा प्रश्न अनेकांना पडला. तर त्यांच्या गप्पा सुरू असतानाच उदिति सिंह पण असं काही बोलून गेली, ज्यामुळे हे बोलणं आणखीनच रंजक झालं.

बिग बॉसमध्ये माही विजचा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. शोमध्ये ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक खुलासे करताना दिसते.काही दिवसांपूर्वी तिने सांगितलं होतं की, तिचे एक्स आजही दारू पिऊन तिला फोन करतात आणि ती खूप चांगली असल्याचं सांगतात. तिच्यासारखी दुसरी कोणी मिळणार नाही, असंही ते म्हणतात. आता अभिनेत्रीने शोमध्ये असं काही विधान केलंय, ज्यामुळे ती पुन्हा नव्या प्रेमाच्या शोधात आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

काझी तौकीरने माहीला विचारला काय विचारलं ?

‘बिग बॉस 20’ हा रिॲलिटी शो सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. शोच्या अलीकडील भागात माही विज, काझी तौकीर आणि उदिती सिंह एकत्र बसून गप्पा मारत होते. त्याचवेळी काझी ने माहीला एक प्रश्न विचारला. कोणी तिला प्रपोज करू शकतं का? म्हणजेच तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा ठेवू शकतं का? हा प्रश्न ऐकताच माहीने लगेच उत्तर दिले की, प्रत्येकजण माझ्याशी संपर्क साधू शकत नाही आणि मी सर्वांसाठी उपलब्ध नाही. तिचे उत्तर ऐकल्यानंतर काझीने मजेशीर अंदाजात तिला या विषयावर थोडे मोकळेपणाने बोलण्यास सांगितलं. त्यानंतर माही विचारात पडली.

माही विज पुन्हा नव्या प्रेमाच्या शोधात?

याच संभाषणादरम्यान काझीने हसत म्हटलं की, माहीने कदाचित स्वतःसाठी कोणाची तरी निवड केली असावी, जी व्यक्ती तिला प्रपोज करू शकते. मात्र, माहीने या प्रश्नावर होकारही दिला नाही आणि नकारही दिला नाही. त्यानंतर उदिती सिंहनेही मजेशीर अंदाजात म्हटलं की, कदाचित माहीची एखादी खास व्यक्ती तिचा हा शो पाहत असेल. तिचं हे बोलणं ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये उत्सुकता वाढली.

मात्र, माहीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल यापुढे कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळे आता माहीच्या आयुष्यात खरंच कोणीतरी खास व्यक्ती आहे का आणि ती पुन्हा नव्या प्रेमाच्या शोधात आहे का, याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.

यापूर्वीही माही बिग बॉसमध्ये तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलली होती. अनेक खुलासे तिने केले होते. माहीच्या आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर 2010 साली तिने अभिनेता जय भानुशालीशी लग्न केलं. ते बराच काळ एकमेकांसोबत होते, प्रेक्षकांनाही त्यांची जोडी खूपच आवडायची. त्यांना तीन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचा ताराचा जन्म 2019 साली झाला तर राजवीर आणि खुशी ही त्यांची फॉस्टर मुलं असून 2017 साली ते त्यांच्या कुटुंबाचा भाग बनले. या वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये जय आणि माही यांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला, त्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Follow Us
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?