तर करीनाच्या जागेवर प्रसिद्ध झाली असती ही सुंदर अभिनेत्री, तो चित्रपट हातातून निसटला अन्…सिक्रेट आलं समोर!

Bigg Boss 20 : सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसचा सध्या 20 वा सीझन सुरू अनेक सेलिब्रिटी, त्यात स्पर्धक म्हणून सहभागी झालेत. मुंबईत आपली सुरूवात कशी झाली आणइ करीना करूपला मिळालेला एक रोल ऑपल्याला कसा ऑफर झाला होता, याबद्दल माही विजने बिग बॉसमध्ये सांगितलं. मात्र एका कारणामुळे थोडक्यात तिच्या हातातून ही संधी निसटली.

तर करीनाच्या जागेवर प्रसिद्ध झाली असती ही सुंदर अभिनेत्री, तो चित्रपट हातातून निसटला अन्...सिक्रेट आलं समोर!
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 16, 2026 | 8:09 PM

बिग बॉसचा सध्या 20 वा सीझन सुरू असून अनेक सेलिब्रिटी स्पर्धक त्यात आहेत. याच रिॲलिटी शोमध्ये आलेली, टीव्हीवरची प्रसिद्ध अभिनेत्री माही विज हिने मनोरंजन क्षेत्रातील सुरूवातीच्या दिवसाच्या आठवणी सांगितल्या. टीव्ही क्षेत्रात यशस्वी होण्यापूर्वी ज्या ऑफर्स मिळाल्या, त्याबद्दल माहीने सांगितलं. बिग बॉस 20 च्या घरात सह-स्पर्धक कनिका मान हिच्याशी गप्पा मारताना माही विजने तिच्या पहिल्या म्युझिके व्हिडीओबद्दल आठवणींना उजळ दिल्या. साऊथ इंडियन चित्रपटात काम करण्यापासून ते एकामागोमाग एक चित्रपट रिजेक्ट करण्याबद्दलही माही बोलली. अखेर त्यानंतर ती टीव्ही क्षेत्रात आली.

मुंबईत कसं सुरू झालं करिअर ?

बिग बॉसच्या घरात माही विजने जुन्या आठवणींना उजाळा दिला. करिअरच्या सुरूवातीलाच मी मुंबईत आले आणि काही वेळातच मला एक मोठी संधी मिळाली, असं तिने सांगितलं. ‘ मुंबईत येताच मला म्युझिक व्हिडीओ मिळाला. तू तू है वही’ गाण्यात पिंक ड्रेसमध्ये मी झळकले. तो माझा पहिला म्युझिक व्हिडीओ होता, त्यानंतर मला एकमागोमाग एक असे अनेक प्रोजेक्ट मिळाले’, असं माही म्हणाली. ‘ त्यानंतर माझ्या लाईफमध्ये खूप म्युझिक व्हिडीओज होते.. सगळे हिट झाले ते, सगळे’ .. असं तिने नमूद केलं.

मणि रत्नम यांच्या फिल्मध्ये मोठी संधी

सलामान खानच्या शोमध्ये माहीने पुढे मोठा खुलासा केला. दिग्गज दिग्दर्शक मणीरत्नम यांच्या एका चित्रपटासाठी मला विचारण्यात आलं होतं, असंही माहीने सांगितंलं. मी साऊथ इंडिय सिनेमामध्ये काम केलं. तिथे प्रभूदेवा आणि मामुटी याचे पिक्चर पाहिले. फायनलमी मला मणिरत्नम यांच्या ‘युवा’ चित्रपटात घेण्याचा विचार झाला. मणिरत्नम यांनी मला ‘युवा’साठी सिलेक्ट केलं, असं ती म्हणाली. ज्या रोलबद्दल माही सांगत होती, ती भूमिका नंतर करीना कपूरने केली.

का निसटली हातातून संधी ?

2004 साली आलेल्या ‘युवा’ चित्रपटाचं दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केलं आणि त्यामध्ये अजय देवगण, करीना कपूर, राणी मुखर्जी , अभिषेक बच्चन आणि विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत दिसले. IMDb वर या चित्रपटाला 7.4 रेटिंग मिळालं आणि हिदीसोबतच हा चित्रपट तेलुगू आणि बंगालीतही बनला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट नक्की पहायला मिळेल. त्या चित्रपटात माहीला रोल ऑफर झाला होता. विवेक ओबेरॉयच्या अपोझिट तिला काम करायचं होतं, पण तिकडे थोडंसं वाजलं (माझं) असं माहीने सांगितलं. पण तिचं भांडण नक्की कोणाशी झालं ते काही तिने नमूद केलं नाही, मात्र त्यामुळे युवामध्ये कामी करण्याची संधी तिच्या हातून निसटली. अन्यथा करीनाच्या जागी तीच मोठ्या पडद्.ावर दिसली असती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us