AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिला बाहेर काढा, बिग बॉस बघायची इच्छाच संपली..; कोणावर भडकले प्रेक्षक?

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. यातले काही स्पर्धक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. तर काही जणांवर प्रेक्षक प्रचंड चिडले आहेत. अशाच एका स्पर्धकाबद्दल नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हिला बाहेर काढा, बिग बॉस बघायची इच्छाच संपली..; कोणावर भडकले प्रेक्षक?
Bigg Boss Marathi 6 Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 05, 2026 | 1:21 PM
Share

‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या सिझनचा चौथा आठवडा सुरू असून आतापर्यंत घरात बरेच वाद झाले आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क पार पडला. या घरातील समीकरणं क्षणाक्षणाला बदलत असतात, पण आता घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या एपिसोडमध्ये स्पर्धकांदरम्यान हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेलं भांडण आता वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचल्याचं दिसतंय. टास्कदरम्यान रुचिता जामदार आणि करण सोनावळे यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. रुचिताने अंगाला हात लावल्याचा आरोप करणने केला. त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. नंतर राकेश बापटसोबतही तिचं जोरदार भांडण झालं. यावेळी रुचिताने चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप राकेशने केला. रुचिताच्या अशा वागण्याने घरातील इतर स्पर्धक आणि त्याचसोबत प्रेक्षकसुद्धा चिडले आहेत.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. रुचिता जामदार आणि अनुश्री माने यांना शोमधून काढून टाका, असं एकाने लिहिलं. तर ‘सिझन 5 मध्ये आर्याने निक्कीला मारलेलं, तेव्हा आर्याला बिग बॉसने घराबाहेर काढलं होतं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘रुचिताचा आवाज ऐकून लोक बिग बॉस बंद करतात’, अशीही टीका एका नेटकऱ्याने केली. ‘रुचिताला बाहेर काढा, ती शोमधली विलेन आहे’, असंही काहींनी म्हटलं आहे. रुचिताच्या ड्रामामुळे बिग बॉस बघायची इच्छा संपली, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भाऊचा धक्का एपिसोडमध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुखने याआधी रुचिताला तिच्या वागण्यावरून चांगलंच फटकारलं आहे. पहिल्या एपिसोडपासून रुचिता बिग बॉसच्या घरात भांडताना आणि वाद घालताना दिसतेय. शिवाय आता राकेश बापट थेट भाऊच्या धक्क्यावर रुचिताची तक्रार करणार आहे, त्यामुळे रितेश त्यावर कोणती भूमिका घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

रुचिता जामदार ही मूळची कोल्हापूरची असून पहिल्या एपिसोडपासून ती चर्चेत आहे. तिचे वडील स्विगी डिलिव्हरीचं काम करतात. तर रुचिता सुरुवातीला लोकांच्या लग्नामध्ये डान्स करून पैसे कमवायची. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून तिने सुरुवात केली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...