AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सगळ्या विषयात 35% बिग बॉस गाजवणाऱ्या स्पर्धकाता निकाल चर्चेत

सध्या सोशल मीडियावर बिग बॉस मराठीमधील एका जुन्या स्पर्धकाची चर्चा रंगली आहे. या स्पर्धकाचा बारावीच्या परिक्षेतील निकाल चर्चेचा विषय ठरला आहे. आता हा स्पर्धक कोण आहे चला जाणून घेऊया...

सगळ्या विषयात 35% बिग बॉस गाजवणाऱ्या स्पर्धकाता निकाल चर्चेत
बिग बॉस स्पर्धकImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 29, 2026 | 2:36 PM
Share

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बिग बॉस मराठीचा सहावा सिझन चर्चेत आहे. यंदा सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांची चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, मागील सीझनमधील एक स्पर्धक पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. तो स्पर्धक म्हणजे कोल्हापूरचा डीपी दादा अर्थात धनंजय पोवार. त्याने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

नुकताच धनंजयने सोशल मीडियावर एक जुनी आणि मजेदार आठवण शेअर केली आहे. शाळेत असताना बारावीच्या परीक्षेत त्याला केवळ ३५ टक्के गुण मिळाले होते. विशेष म्हणजे, जवळपास प्रत्येक विषयात त्याला exactly ३५ टक्केच मार्क्स मिळाले होते. त्या वेळी ही बातमी थेट वर्तमानपत्रात छापून आली होती. “काठावर पास तरीही झक्कास!” अशा भन्नाट कॅप्शनसह धनंजयचा फोटोही प्रसिद्ध झाला होता.

२००५ सालची आठवण

धनंजयने त्या काळातील वर्तमानपत्रातील कात्रण सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शन दिले आहे: “खूप वर्षांनी हे सापडलंय… हाय काय! नाही पहिल्यापासून टॉपला!” ही घटना २००५ सालची आहे. तेव्हा धनंजय इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये शिकत होता. आर्ट्स शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या धनंजयला एकूण ३५ टक्के गुण मिळाले होते.

डीपी दादाची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, “काठावर पास पण आयुष्यात टॉप!” तर दुसऱ्याने म्हटले, “दादा, तुमचा विषयच लय हार्ड आहे बघा!” आणखी एकाने कमेंट केली, “शाळेत काठावर पास झाला असलास तरी आयुष्यात मात्र तू सर्वात यशस्वी आहेस दादा!”

बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये दमदार खेळीने घराघरात पोहोचलेल्या डीपी दादाने शो संपल्यानंतर ‘शिट्टी वाजली रे’ या स्टार प्रवाहच्या रिअलिटी शोमध्येही कॉमेडीने प्रेक्षकांना गुदगुल्या केल्या होत्या. सध्या तो सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओ बनवण्यासोबतच आपला वडिलोपार्जित फर्निचरचा व्यवसायही सांभाळत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...