AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

65 वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा राडा, नेमकं प्रकरण काय?

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डॉ. गायकवाड यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

65 वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण; 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा राडा, नेमकं प्रकरण काय?
Divya ShindeImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 27, 2026 | 11:56 AM
Share

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम रीलस्टार दिव्या शिंदे हिने साथीदारांसह पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. ‘कला आविष्कार महोत्सवा’ची प्रसिद्धी केल्याच्या नावाखाली पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा पोलिसांत दाखल तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी दिव्या शिंदेसह आण्णा ढमढेरे आणि अन्य आठ ते दहा जणांविरुद्ध काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. विद्याधर गायकवाड हे 2021 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधून मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले. ते करुणादीप फाउंडेशनचे सदस्य आहेत. या संस्थेच्या वतीने 1 ते 3 सप्टेंबरदरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी दिव्या शिंदे हिला गायकवाड किंवा संस्थेकडून कोणतंही अधिकृत आमंत्रण देण्यात आलं नव्हतं, तसंच कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासही तिला सांगण्यात आलं नव्हतं, असा तक्रारीत उल्लेख आहे. मात्र, आपण कार्यक्रमाची प्रसिद्धी केल्याचा दावा करत ऑगस्टपासून दिव्या शिंदेकडून फोन आणि संदेशांद्वारे पाच लाख रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचं गायकवाड यांनी पोलिसांना सांगितलं.

17 सप्टेंबर रोजी दिव्या शिंदे, आण्णा ढमढेरे आणि काही अन्य व्यक्ती गायकवाड यांच्या घरी गेल्याचं तक्रारीत नमूद आहे. त्यावेळी गायकवाड घरी नसल्याने त्यांच्या पत्नी आणि मुलाला दमदाटी करण्यात आली. यानंतर 23 सप्टेंबरला ढमढेरे याने फोन करून गायकवाड यांना हॉटेल ब्ल्यू नाईन इथं बोलावलं. तिथे पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास दोन दिवसांत घरी माणसं पाठवून मारहाण करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.

24 सप्टेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास गायकवाड घरी एकटे असताना ढमढेरे तिथे आला. त्यांनी दरवाजा उघडताच दिव्या शिंदेसह आठ ते दहा जण घरात घुसले. आरोपींनी गायकवाड यांच्या तोंडावर, पोटावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पैसे का दिले नाहीत, असा सवाल करत त्यांना धमकावण्यात आलं. गायकवाड यांनी आपण पक्षाघाताचे रुग्ण असल्याचं सांगून मारहाण थांबवण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतरही मारहाण सुरूच राहिला. एका व्यक्तीने धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केला. त्यानंतर दांडके, कमरेचे पट्टे आणि लोखंडी भांड्याने मारहाण करण्यात आली.

काही वेळाने गायकवाड यांचा मुलगा आणि सून घरी आल्यानंतर त्यांनाही दमदाटी करण्यात आली. पाच लाख रुपये न दिल्यास कार घेऊन जाण्याची धमकी देत आरोपी गायकवाड यांची कार घेऊन गेल्याचा आरोप आहे. घरातील साहित्याची तोडफोडही करण्यात आली.

Follow Us
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप