AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमिर खान याचा तिसऱ्या लग्नानंतर मोठा निर्णय, थेट तिन्ही पत्नींसोबत राहणार, मुंबईच्या..

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने तिसरे लग्न गाैरी स्प्रेटसोबत केले. आमिरने नव्या आयुष्याची सुरूवात केली. यादरम्यानच आमिर खान याने अत्यंत मोठा निर्णय घेतला. आमिर खान तिसऱ्या लग्नानंतर आपल्या तिन्ही पत्नींसोबत एकाच छताखाली राहणार आहे.

आमिर खान याचा तिसऱ्या लग्नानंतर मोठा निर्णय, थेट तिन्ही पत्नींसोबत राहणार, मुंबईच्या..
Aamir Khan
| Updated on: Jul 11, 2026 | 12:39 PM
Share

बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. नुकताच आमिर खान याने तिसरे लग्न केले. या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओही पुढे आले. आमिर खान याने तिसरे लग्न गौरीसोबत केले. मागील अनेक वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात मैत्री होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करत थेट लग्न केले. लग्नानंतर गाैरी स्प्रेटसोबत आमिर खानने आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली. तिसरे लग्न करताच आमिर खान याने मोठा निर्णय घेत 100 करोड रूपये रक्कम देत थेट नवीन घराची बुकिंग केली. अॅडवान्स रक्कम 100 करोड आमिर खानने दिली. विशेष म्हणजे या नवीन आलिशान घरात आमिर खान हा फक्त तिसरी पत्नी गाैरी हिच्यासोबतच राहणार नाही तर पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीसोबतही एकाच छताखाली राहणार आहे.

फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, आमिर खान आणि गाैरी यांचे नवीन हे घर मुंबईच्या खार परिसरात असणार आहे. सध्या लग्नानंतर गाैरीसोबत आमिर खान हा पालीतील विलनोमोना बिल्डिंगमध्ये राहत आहे. यूनियम पार्कमधील मरीन अपार्टमेंट्समध्ये नवीन पत्ता आमिर खानचा आहे. या घरात तो आपल्या तिन्ही पत्नी आणि मुलांसोबत राहणार आहे. ही इमारत 2030 पर्यंत पुर्ण होईल.

या टावर्समध्ये आमिर खान याने एक डझनच्या आसपास फ्लॅट खरेदी केली आहेत. मरीना टॉवर्सचे बांधकाम सध्या सुरू आहे. या इमारतीमध्ये तीन मजले आमिर खान याची पत्नी गाैरी स्प्रेट आणि तिचा मुलगा क्विन राहणार आहेत. या इमारतीमध्ये आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता आणि मुलगा जुनैद एका फ्लोरवर राहतील. त्यांच्यासाठी स्वतंत्र फ्लोर असेल.

यासोबतच आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद राव खान यांच्यासाठीही एक स्वतंत्र फ्लोर असेल. आमिर खान याची आई जीनत हुसेन आणि दोन्ही बहिणी निखत आणि फरत यांच्यासाठीही खास फ्लोर या इमारतीमध्ये असणार आहे. सध्या आमिर खान हा दोन्ही मुले, आई आणि पत्नी गाैरी याच्यासोबत विल्नोमोना बिल्डिंगमध्ये राहत आहे. पूर्ण कुटुंब आलिशान टॉवरमध्ये 2030 मध्ये शिफ्ट होईल. सर्व कुटुंब एकत्र राहावे, याकरिता हा मोठा निर्णय आमिर खानने घेतल्याचे कळतंय.

Follow Us
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना