ऐश्वर्याच्या वादग्रस्त मीमवर विवेक ओबेरॉयचा माफीनामा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलबाबत अभिनेता विवेक ओबेरॉयने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनवर एक मीम शेअर केलं होतं. यानंतर नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. या प्रकरणी विवेक ओबेरॉयने नुकतेच ट्विट करत जाहीर माफी मागितली आहे. तसेच त्याने ऐश्वर्या रायबाबत शेअर केलेलं मीमही काढून टाकलं आहे. विवेकने नुकतंच एकत्र दोन ट्विट केले आहेत. कधी कधी आपण …

vivek oberoi, ऐश्वर्याच्या वादग्रस्त मीमवर विवेक ओबेरॉयचा माफीनामा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलबाबत अभिनेता विवेक ओबेरॉयने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनवर एक मीम शेअर केलं होतं. यानंतर नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. या प्रकरणी विवेक ओबेरॉयने नुकतेच ट्विट करत जाहीर माफी मागितली आहे. तसेच त्याने ऐश्वर्या रायबाबत शेअर केलेलं मीमही काढून टाकलं आहे.

विवेकने नुकतंच एकत्र दोन ट्विट केले आहेत. कधी कधी आपण सहज गंमत वाटते म्हणून एखादी गोष्ट शेअर करतो. आपल्याला ती गंमत वाटत असली, तरी इतर लोक त्याचा वेगळाच अर्थ काढतात. मी गेल्या 10 वर्षात 2000 पेक्षा अधिक महिलांच्या सशक्तीकरणासाठी काम केलं आहे. त्यामुळे मी कोणत्याही महिलेचा अपमान करण्याबाबात विचार करु शकतं नाही. असे विवेकने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर अजून एक ट्विट करत ”माझ्या मीममुळे एखाद्या महिलेचा अपमान झाला असेल, तर मी ती सुधारु इच्छितो आणि त्याची माफी मांगू इच्छितो”, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय मी केलेले हे ”वादग्रस्त ट्विट मी डिलीट केले आहे”, असेही विवेकने म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

लोकसभा निवडणुकीचे निकाल अवघ्या काही दिवसांवर ठेपला आहे. याबाबतचे एक्झिट पोल नुकतेच समोर आले. हे एक्झिट पोल खोटे असल्याचं सांगत अनेकांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात येत आहे. त्याच एक्झिट पोलची चेष्टा करताना ऐश्वर्या राय बच्चनची सुद्धा खिल्ली उडवली आहे. विवेक ओबेरॉयने काल ट्विटरवर एक फोटो शेअर केला. त्यात पहिल्या फोटोत ऐश्वर्या सलमान खानसोबत दिसते आहे, त्यावर ‘ओपिनिअन पोल’ असं लिहिलं आहे. दुसऱ्या फोटोत ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉय दिसत आहेत, या फोटोवर ‘एक्झिट पोल’ आणि तिसऱ्या फोटोत अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत ऐश्वर्या दिसत आहे, यावर ‘रिझल्ट्स’ लिहिलेलं आहे.

या फोटोला विवेकने कॅप्शन देताना “Haha! creative! No politics here….just life”, असं म्हटलं आहे.

या प्रकरणानंतर विवेक ओबेरॉयवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. या पोस्टमुळे विवेकवर अनेकांनी नाराजी व्यक्ती केली होती. बॉलिवूड कलाकारांनीही विवेकच्या या पोस्टवर नाराजी व्यक्त केली होती. या वादग्रस्त ट्विटनंतर विवेकने  “ यात माझी चुक असेल, तर ती सिद्ध करुन दाखवावी, तरच मी माफी मागेन”, असं एका प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं  होतं. यानंतर विवेकला महाराष्ट्र महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे.

“मी हे कोणत्या पब्लिसिटीसाठी केलेले नाही. आमच्या सर्वांचा एक भूतकाळ आहे. यामध्ये काही मोठी गोष्ट नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल बोलता, तेव्हा तुम्हाला तुमचा अपमान झाल्यासारखे वाटते का?”, असं महिला आयोगाच्या नोटीसला उत्तर देताना विवेक म्हणाला होता.

संबंधित बातम्या :

ऐश्वर्या रायचं मीम शेअर करणं महागात, विवेक ओबेरॉयवर सोनम कपूरही भडकली

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *