ऐश्वर्या रायचं मीम शेअर करणं महागात, विवेक ओबेरॉयवर सोनम कपूरही भडकली

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वी रविवारी निकालाचा अंदाज वर्तवणारे अनेक एक्झिट पोल जाहीर केले. त्यानुसार, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला. यानंतर अभिनेता विवेक ओबेरॉयने ट्विटरवर एक मीम ट्वीट केलं. या मीममुळे विवेकवर सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विवेकच्या ट्वीटवर आता बॉलिवूड कलाकारही टीका करत …

ऐश्वर्या रायचं मीम शेअर करणं महागात, विवेक ओबेरॉयवर सोनम कपूरही भडकली

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वी रविवारी निकालाचा अंदाज वर्तवणारे अनेक एक्झिट पोल जाहीर केले. त्यानुसार, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला. यानंतर अभिनेता विवेक ओबेरॉयने ट्विटरवर एक मीम ट्वीट केलं. या मीममुळे विवेकवर सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विवेकच्या ट्वीटवर आता बॉलिवूड कलाकारही टीका करत आहेत. अभिनेत्री सोनम कपूर हिने विवेकच्या या वागणुकीला ‘क्लासलेस’ म्हणजेच खालच्या पातळीचं म्हटलं आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारत असलेल्या विवेक ओबेरॉयने एक ट्वीट केलं. त्यात एक्झिट पोलची चेष्टा करताना ऐश्वर्या राय बच्चनची सुद्धा खिल्ली उडवली. विवेक ओबेरॉयने ट्वीट सोबत एक फोटो शेअर केला. त्यात पहिल्या फोटोत ऐश्वर्या सलमान खानसोबत दिसते आहे, त्यावर ‘ओपिनिअन पोल’ असं लिहिलं होतं. दुसऱ्या फोटोत ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉयसोबत दिसत आहेत, या फोटोवर ‘एक्झिट पोल’ आणि तिसऱ्या फोटोत अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत ऐश्वर्या दिसत आहे, यावर ‘रिझल्ट्स’ लिहिलेलं आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शन दिले, “Haha! creative! No politics here….just life”.

सोनम कपूर, ज्वाला गुट्टा काय म्हणाल्या?

“डिसगस्टिंग आणि क्लासलेस” अशा शब्दांत सोनम कपूरने विवेकवर टीका केली. तर भारतीय बॅटमिंटन पटू ज्वाला गुट्टानेही विवेकच्या ट्वीटवर नाराजी व्यक्त केली. “तुमच्याकडून करण्यात आलेला हा ट्वीट तथ्यहिन आहे. निराशाजनक”, असं ज्वाला गुट्टा म्हणाली.

“कुणाच्या व्यक्तीगत जीवनावर मुर्खासारखे विनोद करण्याव्यतिरिक्त काही चांगल काम करा. लुझर”, असं म्हणत एका व्यक्तीने विवेकवर हल्लाबोल केला. तर “कुणाच्या व्यक्तीगत जीवनाला अशाप्रकारे सोशल मीडियावर उघड करणे हे चुकीचे आहे. कारण, यामुळे ती व्यक्तीच नाही तर तिच्याशी संबंधित लोकही प्रभावित होतात”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता विवेकच्या ट्वीटवर येऊ लागल्या आहेत.

ऐश्वर्याच्या खाजगी जीवनाबाबत भाष्य करणारं ट्वीट केल्याने विवेकला आता मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

दुसरीकडे विवेक ओबेरॉयने त्याच्या या ट्वीटबाबत माफी मागण्यास साफ नकार दिला आहे. त्याच्या मते त्याने काहीही चुकीचं केलेलं नाही. त्याने कुठल्याही प्रकारे ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, त्यांची मुलगी आराध्या किंवा सलमान खानला दुखावलेलं नाही. त्यामुळे तो माफी मागमार नाही, असं त्याने स्पष्ट केलं. नेते फक्त या मुद्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा पलटवार त्याने नेतेमंडळीवर केला आहे. मी काहीही चुकीचं केलेलं नाही, कुणीतरी मीम बनवलं आणि मी ते शेअर केलं, यात मला काहीही चुकीचं वाटत नाही, असं स्पष्टीकरण विवेक ओबेरॉयने दिलं.

1999 मध्ये आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमानंतर ऐश्वर्या राय आणि सलमान खान हे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर 2002 मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर काही काळासाठी ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, हे नातंही जास्त काळ टिकू शकलं नाही. अखेर 2007 मध्ये ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *