AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याचं स्पष्ट मत, आता ते…

"ठेकेदारांचे घर भरण्यापेक्षा मुंबईकरांना दिलासा द्या, असं आम्ही नेहमी म्हणत होतो. मात्र कधीही मुंबईकरांकडे लक्ष दिले नाही. यावेळी मुंबईकरांनी योग्य माणसाकडे सत्ता दिली आहे"

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याचं स्पष्ट मत, आता ते...
Sharad Pawar-Ajit Pawar
| Updated on: Feb 12, 2026 | 1:23 PM
Share

“पुढील अर्थसंकल्पात आम्ही शहरासाठी 1500 कोटी मागत आहोत, शहराची वाढती लोकसंख्या, येणारे उद्योग पाहून जिल्ह्याला भरीव तरतूद आली पाहिजे. आता पर्यंतचा शहराचा बॅकलॉग भरून निघाला नाही. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देऊन न्याय देतील अशी अपेक्षा” असं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री संजय शिरसाट म्हणाले. “राष्ट्रवादीमधे अंतर्गत सुरू असलेल्यां वादावर आम्ही बोलणं योग्य नाही. त्यांच्यातील एक गट विलीनीकरण होय म्हणतोय तर दुसरा नाही म्हणतोय. आता दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होईल, असं शक्य वाटत नाही. आता जुन्या गोष्टींवर बोलणे योग्य नाही. दोन्हीकडील नेत्यांनी बसवून ठरवलं पाहिजे. काही नेत्यांना विलीनीकरण मान्य नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.

रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.रोहित पवार यांनी केलेल्या सर्व आरोपांची छाननी होईल. त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्या चौकशी अहवालात सर्व स्पष्ट होईल” असं संजय शिरसाट म्हणाले. “निवडणूक हरल्यावर मनाला समाधान देण्यासाठी असे वाक्य चांगले वाटते. मात्र पराभव हा पराभव असतो. यामध्ये तंत्,मंत्र अवलंबले जातात ते सर्वांनी मान्य केलं पाहीजे” असं उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा परिषदेसंदर्भातल्या वक्तव्यावर संजय शिरसाट म्हणाले.

यावेळी मुंबईकरांनी योग्य माणसाकडे सत्ता दिली

“न्यायालयाने जे ताशेरे ओढले ते अत्यंत अनुभवातून केलं आहे. ठेकेदारांचे घर भरण्यापेक्षा मुंबईकरांना दिलासा द्या, असं आम्ही नेहमी म्हणत होतो. मात्र कधीही मुंबईकरांकडे लक्ष दिले नाही. यावेळी मुंबईकरांनी योग्य माणसाकडे सत्ता दिली आहे” असं संजय शिरसाट मुंबईच्या महापौर पदावरुन म्हणाले. “राजेंद्र जंजाळ सारखे सर्वगुण संपन्न नेतृत मिळालं हे आमचं भाग्य आहे. अन्यथा आम्ही मुकलो असतो. भविष्यात ते महाराष्ट्राचे मुखमंत्री व्हावे” असं शिरसाट म्हणाले.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!