AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय हिचा अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर मोठा खुलासा, म्हणाली, ज्या पद्धतीने मला…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे चित्रपटच नाही तर खासगी आयुष्यही चर्चेत असते. अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे, यावर चाहत्यांच्या बारीक नजरा असतात. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल नेमके कसे नाते आहे, यावर बोलताना ऐश्वर्या दिसली.

ऐश्वर्या राय हिचा अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर मोठा खुलासा, म्हणाली, ज्या पद्धतीने मला...
Aishwarya Rai Interview
| Updated on: Nov 05, 2025 | 9:05 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे, यावर चाहत्यांच्या बारीक नजरा आहेत. काही दिवसांपूर्वीच लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत विमानतळावर ऐश्वर्या स्पॉट झाली. 2007 मध्ये ऐश्वर्याने अमिताभ बच्चन यांचा लेक अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. अनेक वर्ष सुखाचा संसार सुरू असतानाच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेने रान उठले. मात्र, यावर ना कधी ऐश्वर्या, अभिषेक किंवा बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. अभिषेकसोबत फार जास्त कुठे ऐश्वर्या दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच अभिषेकला त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी ऐश्वर्या राय उपस्थित नव्हती. यादरम्यान अभिषेक बच्चन हा ऐश्वर्याचे नाव घेताना दिसला.

शक्यतो ऐश्वर्या राय असो किंवा अभिषेक बच्चन आपल्या कुटुंबाबद्दल फार कमी बोलतात. कुटुंबातील गोष्टींबद्दल अजिबातच चर्चा करत नाहीत. ऐश्वर्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती सासरे अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना दिसली. सासऱ्यांबद्दल पहिल्यांदाच खुलासा करताना ऐश्वर्या राय दिसली. नेमके तिचे आणि अमिताभ बच्चन यांचे नाते कसे आहे हे तिने सांगितले.

मुलाखतीमध्ये ऐश्वर्या रायला विचारण्यात आले की, प्रसिद्ध अभिनेते आणि तुझे सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत कसे नाते आहे? यावर उत्तर देताना ऐश्वर्या रायने म्हटले होते की, मी त्यांचा आदर, सन्मान करते आणि ते खूप जास्त चांगले आहेत. माझ्यासाठी ते वडील आहेत. ज्या पद्धतीने मला स्वीकारण्यात आले आणि प्रेम देण्यात आले त्याबद्दल मी खरोखरच त्यांची आभारी आहे.

यादरम्यान बच्चन कुटुंबाबद्दल बोलतान ऐश्वर्या राय दिसली. ऐश्वर्या राय हिने ही मुलाखत काही वर्षांपूर्वी दिली होती आणि पहिल्यांदाच ती स्पष्टपणे बच्चन कुटुंबियांबद्दल बोलताना दिसली. अनंत अंबानीच्या लग्नात ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबियांसोबत दिसली होती. अमिताभ बच्चन हे आपल्यावर एका मुलीसारखे प्रेम करतात, असे एका मुलाखतीमध्येही ऐश्वर्या राय हिने म्हटले होते. लग्नानंतरही ऐश्वर्या राय काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसली आहे.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...