Alia Bhatt | रणबीर कपूर-संजय लीला भन्साळींना कोरोना, आलियाही घाबरली! स्वतःला केले क्वारंटाईन

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता रणबीर कपूर या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Alia Bhatt | रणबीर कपूर-संजय लीला भन्साळींना कोरोना, आलियाही घाबरली! स्वतःला केले क्वारंटाईन
आलियाही घाबरली! स्वतःला केले क्वारंटाईन
Harshada Bhirvandekar

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 10, 2021 | 9:53 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता रणबीर कपूर या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत आलिया भट्ट या दोघांच्या संपर्कात असल्याने, आता तिला देखील संसर्गाची भीती वाटू लागली आहे. मात्र, आलिया भट्टचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असूनही, तिने स्वत:ला क्वारंटाईन केले आहे (Bollywood Actress Alia Bhatt quarantined her self after sanjay leela bhansali and ranbir kapoor tested positive).

आधी रणबीर आणि आता संजय लीला भन्साळींना देखील कोरोना लागण झाल्याचे कळताच अभिनेत्री आलीय भट्टही प्रचंड घाबरली आहे. काम आणि इतर कार्यक्रमांमुळे आलिया रणबीर आणि संजय यांच्या सतत संपर्कात होती.

आलिया भट्टही चिंतेत!

आलियाला स्वतःचा या कोरोना विषाणूपासून बचाव करायचा आहे. म्हणूनच, अशा परिस्थितीत तिने हे खबरदारीचे पाऊल उचलले आहे. निर्माते संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर त्यांच्या टीममधील अन्य सदस्यांचीही चाचणी घेण्यात येणार आहे. या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री असलेल्या आलियाने स्वतःची कोरोना चाचणी यापूर्वीच करून घेतली होती. मात्र, तिचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे म्हटले जात आहे (Bollywood Actress Alia Bhatt quarantined her self after sanjay leela bhansali and ranbir kapoor tested positive).

‘ब्रह्मास्त्र’ च्या सेटवर झाली कोरोनाची लागण!

मीडिया रिपोर्टनुसार अभिनेता रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवर कोरोना विषाणूची लागण झाली आहे. परवा (8 मार्च) रात्री उशिरापासूनच त्याला संसर्ग झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या, पण याची खात्री पटली नव्हती. अखेर मंगळवारी रणबीरची आई-अभिनेत्री नीतू सिंग यांनी सोशल मीडियावर एक संदेश पोस्ट करून याची पुष्टी केली. रणबीर कपूर याचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘तुमच्या सर्व काळजी व शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे आभार.’ रणबीरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तो सध्या औषधे घेत असून, त्याची प्रकृती आता सुधारत आहे. त्याने स्वत:ला क्वारंटाईन केले आहे आणि आवश्यक त्या सर्व प्रकारच्या खबरदारी देखील घेत आहेत.

संजय लीला भन्साळींमुळे ‘गंगूबाई…’चे शूटिंग थांबले!

चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. त्याचवेळी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची बातमी चर्चेत आली आहे. यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले आहे. या क्षणी संजय लीला भन्साळी यांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शूटिंग चालू असल्याने चित्रपटाच्या उर्वरित सदस्यांचीही कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, आलिया प्रचंड घाबरली असून, अहवाल निगेटिव्ह असला तरी तिने स्वत:ला अलगीकरणात ठेवले आहे.

(Bollywood Actress Alia Bhatt quarantined her self after sanjay leela bhansali and ranbir kapoor tested positive)

हेही वाचा :

Sanjay Leela Bhansali | संजय लीला भन्साळींना कोरोनाची लागण, ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रीकरण-प्रदर्शन पुन्हा लांबणीवर! 

Ranbir Kapoor | रणबीर कपूरला कोरोनाची लागण, आलियाचं वाढलं टेन्शन!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें