Ranbir Kapoor | रणबीर कपूरला कोरोनाची लागण, आलियाचं वाढलं टेन्शन!

कोव्हिड-19ची लस आली असली, लोकांनी ही लस घेण्यास सुरुवात केली असली तरी, अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, नीतू कपूर, अर्जुन कपूर, वरुण धवन यासारखे अनेक सेलेब्रिटी या कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकले होते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:39 AM, 9 Mar 2021
Ranbir Kapoor | रणबीर कपूरला कोरोनाची लागण, आलियाचं वाढलं टेन्शन!

मुंबई : कोव्हिड-19ची लस आली असली, लोकांनी ही लस घेण्यास सुरुवात केली असली तरी, अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, नीतू कपूर, अर्जुन कपूर, वरुण धवन यासारखे अनेक सेलेब्रिटी या कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकले होते. आता अलीकडेच एक बातमी समोर येत आहे. या वृत्तानुसार रणबीर कपूरही (Ranbir Kaoopr) कोरोना पॉझिटिव्ह (Corona) असल्याचे कळते आहे. पिंकविलाच्या अहवालानुसार रणबीर कपूरला सध्या अलगीकरणात ठेवण्यात आले आहे (Bollywood Actor Ranbir Kapoor corona positive).

या प्रसिद्ध वेबसाईटने जेव्हा यासंदर्भात रणबीरचे काका रणधीर कपूर यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सुरुवातीला हो म्हटले आणि मग ते म्हणाले की, ‘रणबीरची तब्येत ठीक नाही, पण त्याला कोरोना झालाय की नाही, हे माहित नाही. मी सध्या शहराबाहेर आहे. मात्र, ही बातमी ऐकताच आलिया भट्ट अस्वस्थ झाली आहे.’

रणबीरला कोरोनाची लागण!

रणबीर कपूरची आई अभिनेत्री नीतू कपूर यांनीही रणबीरला कोरोना झाल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. सध्या तो अलगीकरणात करणात असून, लवकरच यातून बाहेर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

किडनी दान करण्याचा केला होता संकल्प!

11 मार्च रोजी साजरा करण्यात आलेल्या ‘जागतिक किडनी दिना’च्या निमित्ताने ‘ब्रह्मास्त्र’चे दिग्दर्शक अयान मुखर्जी ते कलाकार रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रत्येकाने आपली किडनी दान करण्याचा संकल्प केला. अभिनेत्री आलिया भट्ट हिनेही या दानाचे समर्थन केले. एका स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात या टीमने हा संकल्प केला (Bollywood Actor Ranbir Kapoor corona positive).

आलियासोबतच्या लग्नाचे वृत्त चर्चेत

काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर आलियाशी लग्न करण्याच्या योजनेबद्दल सांगताना म्हणाला की, ‘ही महामारी आपल्या आयुष्यात आली नसती, तर आत्तापर्यंत आमचे लग्न झाले असते. मला माझ्या आयुष्यात लवकरच हे ध्येय पूर्ण करायचे आहे.’

त्याचवेळी जेव्हा मीडियाने आलियाला लग्नाबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, ‘मी लग्न कधी करणार? प्रत्येकजण मला हे प्रश्न का विचारत आहे? आता मी केवळ 25 वर्षांची आहे आणि मला असे वाटते की, या वयात लग्न करणे खूप घाईचे आहे.’ आलियाने पिंकविलाशी बोलताना सांगितले की, ती योग्य वयातच लग्न करेल.

रणबीरच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचे तर, तो ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहेत. याशिवाय तो ‘अ‍ॅनिमल’मध्येही दिसणार आहे, त्यात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा आणि अनिल कपूर आहेत. नुकतेच रणबीरने श्रद्धा कपूरसोबत आगामी चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. मात्र अद्याप चित्रपटाच्या नावाची घोषणा झालेली नाही.

(Bollywood Actor Ranbir Kapoor corona positive)

हेही वाचा :

Saina Trailer | ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधत ‘सायना’चा धडाकेबाज ट्रेलर प्रदर्शित, पाहा हा ट्रेलर…